Samsung चा लेटेस्ट 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

| Updated on: Dec 16, 2021 | 11:44 PM

भारतीय मोबाइल बाजारात अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत. 5G स्मार्टफोन्सच्या बाबतीत सॅमसंग कंपनीदेखील आघाडीवर आहे. कोरीयन टेक कंपनी भारतात अनेक 5G स्मार्टफोन विकते.

Samsung चा लेटेस्ट 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Samsung Galaxy A52s
Follow us on

मुंबई : भारतीय मोबाइल बाजारात अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत. 5G स्मार्टफोन्सच्या बाबतीत सॅमसंग कंपनीदेखील आघाडीवर आहे. कोरीयन टेक कंपनी भारतात अनेक 5G स्मार्टफोन विकते. जर तुम्ही शानदार फीचर्ससह लेटेस्ट 5G मोबाइल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास सॅमसंग फोनबद्दल सांगणार आहोत. याचे नाव Samsung Galaxy A52s आहे. या फोनवर सध्या स्पेशल कॅशबॅक मिळत आहे, ज्या अंतर्गत यूजर्स हा फोन कमी किंमतीत खरेदी करू शकतात. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास यात 12band सपोर्ट असलेला 5G नेटवर्क अँटिना देण्यात आला आहे. तो स्नॅपड्रॅगनच्या 7 सीरीज प्रोसेसरसह येतो. तसेच, यात 120hz च्या रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. (Samsung Galaxy A52s available with discount and cashback offer)

Samsung Galaxy A52s वर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल बोलायचे झाल्यास, ही ऑफर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट (www.samsung.com/in) वर लिस्टेड आहे, सॅमसंगच्या वेबसाईटवर या सेलला Samsung Fest असे नाव देण्यात आले आहे. सॅमसंगचा 5G फोन Samsung Galaxy A52s 5G या सेल दरम्यान लिस्टेड आहे. यावर 6000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक उपलब्ध आहे, ज्यासाठी युजर्सना ICICI बँक कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. तसेच, सॅमसंग शॉप अॅपद्वारे (Samsung Shop App) केलेल्या खरेदीवर 1000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. या फोनवर बेस्ट बाय ऑफर 29,999 रुपये इतकी आहे.

कसा आहे Samsung Galaxy A52s?

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचांचा फुल-एचडी + सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 जी एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

बॅटरी आणि इतर फीचर्स

फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती 25 W सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy A52s मध्ये 5G, Wi-Fi, 4G LTE, GPS, A-GPS, Bluetooth, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

कॅमेरा

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास फोनच्या बॅक पॅनलवर चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 5 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Samsung Galaxy A52s available with discount and cashback offer)