AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किड्यांचा मारा चुकवताना विचित्र अपघात, सांगलीतील आयर्विन पुलावर किड्यांचा भडिमार

सांगलीत किड्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत.

किड्यांचा मारा चुकवताना विचित्र अपघात, सांगलीतील आयर्विन पुलावर किड्यांचा भडिमार
| Updated on: Nov 28, 2020 | 3:00 PM
Share

सांगली : सांगली येथील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर सध्या विचित्र अपघात होत आहेत. आयर्विन पुलावर (Sangli  irwin bridge) सायंकाळच्या सुमारास पथदिव्याखाली किड्यांचा अक्षरश: पाऊस पडत असल्यासारखे चित्र दिसून येते. किड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. किड्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. आजच सोशल मीडियावर किड्यांमुळे झालेल्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे दाहकता लक्षात येते. (Sangli accidents on irwin bridge due to Insects)

वातावरणातील बदल किंवा अन्य कारणामुळे नदीवरील पुलावर अचानक किड्यांची संख्या वाढण्याचे प्रकार घडतात. कालपासून आयर्विन पुलावरील दिव्यांच्या खाली असंख्य किडे फिरत असल्याचे दिसून आले. रात्रीच्या सुमारास अचानक किड्यांची संख्या वाढल्यामुळे दुचाकीस्वार, मोटारचालकांसह सर्वांनाच समोर काहीच दिसत नसल्याचा अनुभव आला.

दुचाकी आणि मोटारीच्या उजेडात किड्यांचा पाऊसच पडत असल्याचे दिसते. या किड्यांपासून बचाव करण्याच्या नादात वाहनचालकांचे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना काचा बंद करुन प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत दुचाकीस्वारांची मात्र तारेवरची कसरत होत आहे. बाईकस्वारांना हे किडे चुकवत मार्ग काढताना अनेकदा अपघातांना सामोरं जावं लागत आहे.

अनेक दुचाकी, सायकलस्वार तसेच मालवाहू रिक्षा चालकांना किड्यांचा त्रास होऊ लागला आहे. रात्रभरातील किडे मरुन पडल्यामुळे आज पुलावर चिखलच झाल्याचे चित्र दिसले.

या किड्यांमुळे झालेल्या अपघाताचा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. दुचाकीवरून निघालेल्या एक तरुण किडे चुकवण्यासाठी खाली मान घालून, हात आडवा करुन गाडी चालवत होता. मात्र त्याचवेळी त्याला समोरून आलेली दुचाकी दिसली नाही. त्यामुळे दोन्ही दुचाकींची जोराची धडक झाली. या अपघातात हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, या अपघाताचा थरार एका दुचाकीस्वारच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

(Sangli accidents on irwin bridge due to Insects)

संबंधित बातम्या 

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.