सांगलीत आई-वडील, बहिणीची धारदार शस्त्राने हत्या, 58 वर्षीय मुलावर संशय

| Updated on: Mar 11, 2020 | 1:09 PM

धारदार शस्त्राने हल्ला करत आई, वडील आणि बहिणीचा पोटच्या मुलानेच निर्घृण खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे Sangli Family Triple Murder

सांगलीत आई-वडील, बहिणीची धारदार शस्त्राने हत्या, 58 वर्षीय मुलावर संशय
Follow us on

सांगली : सांगलीतील एकाच कुटुंबात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि बहिणीच्या हत्येप्रकरणी 58 वर्षीय मुलावर संशय व्यक्त केला जात आहे. मालमत्तेच्या वादातून हत्याकांड घडल्याचा अंदाज आहे. (Sangli Family Triple Murder)

सांगली जिल्ह्यातील उमदी गावात अरकेरी दाम्पत्यासह त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळली होती. धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी (बुधवार 11 मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 82 वर्षीय गुरलिंगाप्पा आण्णाप्पा अरकेरी, 75 वर्षीय पत्नी नागव्वा गुरलिंगाप्पा अरकेरी आणि 62 वर्षीय समुद्राबाई शिवलिंगाप्पा बिरादार यांचे मृतदेह आढळले होते.

धारदार शस्त्राने हल्ला करत आई, वडील आणि बहिणीचा पोटच्या मुलानेच निर्घृण खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 58 वर्षीय मुलगा सिदाप्पा गुरलिंगाप्पा अरकेरी याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. मालमत्तेच्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा : बेडरुममध्ये प्रियकर-प्रेयसी, अचानक आई आल्याने तरुणीची खिडकीतून खाली उडी

दरम्यान, उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. (Sangli Family Triple Murder)

सांगलीतील तिहेरी हत्याकांडाचा इतिहास

सांगलीतील हिवरे गावात आई, मुलगी आणि सून अशा एकाच कुटुंबातील तीन महिलांची साडेचार वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. बहिणीच्या आत्महत्येचा सूड घेण्याच्या भावनेने आरोपींनी हे कृत्य केलं होतं.