Sangli Rain | सांगलीत पावसाचा जोर ओसरला, कृष्णा नदीची पाणी पातळीही घटली

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणा परिसरात मागील चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे वारणा धरण 84.44 टक्के भरलं आहे.

Sangli Rain | सांगलीत पावसाचा जोर ओसरला, कृष्णा नदीची पाणी पातळीही घटली
| Updated on: Aug 07, 2020 | 3:20 PM

सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात (Sangli Rain Update) पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. आज दुपारी 2 वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली. ही पाणी पातळी काल (6 ऑगस्ट) रात्री 24 फुटांवर होती (Sangli Rain Update).

वारणा धरण 84.44 टक्के भरलं

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणा परिसरात मागील चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे वारणा धरण 84.44 टक्के भरलं आहे. काल सुरु केलेला साडेचार हजार चारशे क्यूसेसक्स पाण्याचा विसर्ग आजही सुरु आहे. पाणी पातळीत वाढ होत असून, शिराळा तालुक्यातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत. नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. ओढे – नालेही तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. सांगली जिल्ह्यात आताच्या घडीला तरी कोणाचे स्थलांतर किंवा गावांचा संपर्क तुटलेला नाही.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सांगली जिल्ह्यातील नेहमी पूरबाधित होणाऱ्या गावांना नवीन यांत्रिक बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या या 15 यांत्रिक बोटींचं कृष्णा नदीमध्ये प्रत्याक्षिक घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बंदरे आणि परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटींची चाचणी घेतली आहे.

2019 ला महापुराचा सर्वात मोठा फटका बसलेल्या सांगलीवाडीला यावेळी यांत्रिक बोट मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Sangli Rain Update

संबंधित बातम्या :

पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती

Maharashtra Dam : जून, जुलैमधील पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली