Maharashtra Dam : जून, जुलैमधील पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली

राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली (Water increase in Maharashtra dam) आहेत.

Maharashtra Dam : जून, जुलैमधील पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली

नागपूर : राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं मिळून एकूण 44.8 टक्के भरली (Water increase in Maharashtra dam) आहेत. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातही बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. त्यामुळेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यासोबतच धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे (Water increase in Maharashtra dam).

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या राज्यातील मोठी, मध्यम आणि लघु अशी सर्व धरणं मिळून 44.8 टक्के भरली आहेत. कोकण विभागातील धरणांमध्ये सध्या सर्वाधीक म्हणजे 58.9 टक्के पाणीसाठा आहे, तर त्यापाठोपाठ नागपूर विभागातील धरणं 52.82 टक्के भरली आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागाची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे, या तिन्ही विभागात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणं कितीतरी पट जास्त भरली आहेत.

राज्यात कुठल्या विभागातील धरणं किती भरली

विभाग                      धरणातील पाणीसाठा

अमरावती                      36.96 टक्के

कोकण                            58.9 टक्के

नागपूर                           52.82 टक्के

नाशिक                           37.87 टक्के

पुणे                                 37.87 टक्के

औरंगाबाद                      42.21 टक्के

राज्यात मोठे, मध्यम आणि लघू धरणांमध्ये मिळून सध्या 44.8 टक्के पाणीसाठा आहे. तर राज्यातील मोठी धरणं 50 टक्के भरली आहेत. त्यापाठोपाठ मध्यम धरणांमध्येही 43 टक्के पाणीसाठा सध्या आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Rain | बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट, पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *