Maharashtra Rain | बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 97.7 टक्के पावसाची नोंद झाली (Maharashtra Monsoon Update) आहे.

Maharashtra Rain | बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस

नागपूर : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 97.7 टक्के पावसाची नोंद झाली (Maharashtra Monsoon Update) आहे. राज्यातील समाधानकारक पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत राज्यातील तब्बल 189 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर राज्यातील 93 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पावसाची नोंद झाली आहे (Maharashtra Monsoon Update).

अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या विभागात आतापर्यंत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसानं चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने राज्यातील अनेक धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यासोबत पावसामुळे काही नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. धरणातील पाणी साठ्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

तालुक्यानुसार पडलेला पाऊस

सरासरी पाऊस                                          तालुक्यांची संख्या

100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त                       189 तालुके

75 ते 100 टक्के पाऊस                                   93 तालुके

50 ते 75 टक्के पाऊस                                     55 तालुके

25 ते 50 टक्के पाऊस                                   00 तालुके

राज्यातील सहा विभागांपैकी कुठल्या विभागात किती पाऊस

विभाग              पावसाची टक्केवारी

कोकण                    90 टक्के

नाशिक                  109 टक्के

पुणे                           75 टक्के

औरंगाबाद               121 टक्के

अमरावती               104 टक्के

नागपूर                     80 टक्के

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक टीमला सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यातील विविध भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कंट्रोल रुमला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली

संबंधित बातम्या : 

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट, पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

Maharashtra Rain | राज्यात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात, प्रत्येकाला सज्ज राहण्याची सूचना : विजय वडेट्टीवार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *