
महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले.

संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली.

मात्र ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचं स्पष्ट झालंय. संजय राऊत आपल्या मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेले होते.

महाविकासआघाडीतील प्रत्येक नेत्याच्या भेटीगाठीतून कोणते ना कोणते अर्थ काढले जात आहेत. मात्र, संजय राऊत यांची ही सहकुटुंब भेट सर्वांसाठीच अनपेक्षित ठरली.

ही केवळ सदिच्छा भेट आहे की यावेळी संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये कोणती राजकीय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.