तुझा धर्म कोणता? गणपतीच्या पुजेनंतर सारा अली खान ट्रोल

| Updated on: Sep 05, 2019 | 12:43 PM

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) नुकतंच गणपतीची पुजा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र तिने दुसऱ्या धर्मातील पुजा केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Sara Ali Khan troll) केलं आहे.

तुझा धर्म कोणता? गणपतीच्या पुजेनंतर सारा अली खान ट्रोल
Follow us on

मुंबई : राज्यासह देशभरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून अगदी सिनेसृष्टीतील कलाकारही मोठ्या भक्तीने गणपती (Celebrity Ganpati) पुजा करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) नुकतंच गणपतीची पुजा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र तिने दुसऱ्या धर्मातील देवाची पुजा केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Sara Ali Khan troll) केलं आहे.

सारा अली खानने (Sara Ali Khan troll) नुकतंच इंस्टाग्रामवर एक छान फोटो पोस्ट केला आहे. यात ती गणपतीची पुजा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिने छान पारंपारिक लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. हाच पुजा करतानाचा फोटो नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

गणपती बाप्पा मोरया, तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात आणि तुमचे जीवन आनंदी, सकारत्मकता आणि यशस्वी होऊ दे अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते, अशी कॅप्शनही तिने त्या फोटोला दिली.

मात्र तिने हा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. “तू दुसऱ्या धर्मातील देवाची पुजा कशी करु शकतेस”, असा संतप्त सवाल काही नेटकरी विचारत आहेत. तर काहींनी “तुला हे करताना लाज वाटायला हवी, तू असे करायला नको होते”, असेही सल्ले नेटकऱ्यांनी दिले आहेत.

“तर काहींनी तू मुस्लिम आहेस असे मला वाटले होते”, अशी या फोटोखाली कमेंट केली आहे. त्याशिवाय एकाने “तुझ्या नावासमोर अली खान हे नाव लावू नको, मुस्लीम धर्माची बदनामी करु नकोस”, असाही सल्ला दिला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी साराने तिचा आणि अभिनेता कार्तिक आर्यनचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावरुन हे दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हे दोघेही ‘लव आज कल’ या चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत.

सारा अली खान ही अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. अमृता ही हिंदू पंजाबी आहे, तर सैफ अली खान हा मुस्लीम धर्मीय आहे. त्यामुळे सारा नेहमीच हिंदूसह मुस्लीम धर्माचे सर्वच सण उत्साहात साजरे करते.