लॉकडाऊनमुळे समुद्रातील प्रदुषणात घट, पालघर समुद्रात माशांचा वावर

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Sea pollution decrease due to lockdown) आहे.

लॉकडाऊनमुळे समुद्रातील प्रदुषणात घट, पालघर समुद्रात माशांचा वावर

पालघर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Sea pollution decrease due to lockdown) आहे. या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व बंद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनमुळे समुद्रातील प्रदूषणात घट झाल्याचे समोर (Sea pollution decrease due to lockdown) आलं आहे.

पालघर येथे आशिया खंडातील सर्वात मोठे बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्र आहे. यामध्ये साडे बाराशेपेक्षा जास्त लहान मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच शेजारील समुद्रात सोडलं जात होतं. त्यामुळे येथील खाडी किनारी मिळणारे मासे नाहीसे झाले होते. परिणामी येथील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने बंद असल्यामुळे येथील सांडपाणी समुद्रात सोडले जात नसल्याने समुद्र स्वच्छ दिसू लागले आहेत.

समुद्रातील प्रदुषण घटल्यामुळे येथे माशांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे 12 ते 13 वर्षानंतर समुद्रात पुन्हा रोजगार मिळण्याची आशा या मच्छीमारांना दिसू लागली आहे. सरकार आणि शासनाने ही परिस्थिती बघून लॉकडाऊननंतर या औद्योगिक क्षेत्रात सुरू होणाऱ्या कारखान्यांना योग्य समज आणि आदेश द्यावे जेणेकरून हे समुद्र किनारे असेच स्वच्छ दिसतील अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे देशात सर्व गोष्टी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्र, वायू प्रदुषणात घट झाल्याचेही समोर आले आहे. भरातात पहिल्यांदाच दिल्ली आणि मुंबईसारख्या परिसरातील वायू प्रदुषणात घट झाली आहे.


Published On - 4:08 pm, Fri, 17 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI