खासदार बंडू जाधव यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

शिवसेना खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली (Shambhuraj Desai reaction on MP Sanjay Jadhav life threat).

खासदार बंडू जाधव यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई :शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांना धमकी आलेली आहे. त्याची गृहविभागाने दखल घेतलेली आहे. नांदेड विभागाचे आयजी आणि एसपी यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी तपास योग्यप्रकारे करावा, असे आदेश देण्यात आले आहेत”, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली (Shambhuraj Desai reaction on MP Sanjay Jadhav life threat).

“बंडू जाधव यांनी धमकीबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीची धमकी येत असेल तर पोलिसांनी त्याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे, असे आदेशही दिले आहेत. खासदारांना पोलीस संरक्षण अगोदरच आहे, पण अधिक पोलीस संरक्षण लागत असेल तर तेही दिलं जाईल”, असं शंभूराज यांनी सांगितलं (Shambhuraj Desai reaction on MP Sanjay Jadhav life threat).

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. काल (27 ऑक्टोबर) रात्री उशिरा स्वत: नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

“मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचल्याची शक्यता आहे”, अशी तक्रार खासदार बंडू जाधव यांनी अर्जात केली आहे.

“मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा”, असा आरोप बंडू जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.

‘मराठीचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई होणार’

दरम्यान, शंभूराज देसाई यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ कार्यक्रमात एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अपमान करणारं वक्तव्य केलं. यावर गृहराज्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

“कुणी मुंबईत राहून मराठीचा जाणीवपूर्वक अपमान करत असेल तर निश्चितच कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई ही करु. आम्ही ते विधान तपासू आणि पोलिसांमार्फत चौकशी करु”, असा इशारा गृहराज्यमंत्र्यांनी दिला.

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असतात. कालच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगबद्दल मला अधिकृत माहिती नाही. कालची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जिल्हाप्रमुखांबरोबर झाली आहे. त्यांना नेमका काय आदेश दिला ते मला अधिकृतरित्या माहिती नाही”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

संबंधित बातमी :

मला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी, माझ्या जीवाला धोका, शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची पोलिसात तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI