शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शरद पवार पुन्हा पावसात

| Updated on: Nov 01, 2019 | 6:36 PM

एकीकडे भाजप-शिवसेनेत सत्ता वाटपावरुन वाद सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी (Sharad Pawar visit affected Farmers) सुरू केली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शरद पवार पुन्हा पावसात
Follow us on

नाशिक: एकीकडे भाजप-शिवसेनेत सत्ता वाटपावरुन वाद सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी (Sharad Pawar visit affected Farmers) सुरू केली आहे. ते आज नाशिकमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा (Sharad Pawar visit affected Farmers) घेतानाच ते मदतीचं आश्वासनही देत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये आज जोरदार पाऊस पडत आहे. अशास्थितीतही पवारांनी आपला दौरा सुरुच ठेवला आहे.

शरद पवार म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची अशी माहिती जमा केली जाईल. त्यानंतर ती माहिती राज्य सरकारकडे सुपूर्द करणार आहे. संबंधित भागातील सर्व आमदार यांच्या उपस्थित मी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याविषयी बैठक घेतली जाईन. त्याप्रमाणे सरकारकडे निधीची मागणी करु. सरकारने मदत करावी, अन्यथा या शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीची पुढील भूमिका आम्ही तेव्हा स्पष्ट करु.”

शेतकरी संकटात सापडला आहे. अशा संकटात सापडलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी हातभार लावावा लागेल, असंही शरद पवार यांनी यावेळी नमूद केलं. शरद पवार यांनी दिंडोरी तालुक्यातील खेडगावमध्ये बाळासाहेब तुकाराम दवंगे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेला भेट दिली. द्राक्ष बागेच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई अनुदानासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. तसेच शेतकऱ्यांना धीर आणि दिलासाही दिला.

शरद पवार यांनी घोटी गावालाही भेट देत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.