शिर्डी विमानतळाच्या सभोवताली नवं शहर वसवलं जाणार!, मुख्यमंत्र्यांची मंजुरी

| Updated on: Sep 29, 2021 | 7:37 PM

शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल,रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल.

शिर्डी विमानतळाच्या सभोवताली नवं शहर वसवलं जाणार!, मुख्यमंत्र्यांची मंजुरी
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा
Follow us on

मुंबई : विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे. (A new city with all facilities will be set up around Shirdi Airport)

या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह , सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन , नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल,रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल.

उपयोगिता लक्षात घेवूनच विमानतळाचा विकास व्हावा

केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येवू नये तर जेथे औद्योगिक विकास होऊb शकेल ,पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले. बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधा, विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ

साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ 16 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्षपदी अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळात कोण-कोण?

1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
6. सचिन रंगराव गुजर – सदस्य
7. राहुल कनाल – सदस्य
8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12. सभापती, शिर्डी नगर पंचायत

इतर बातम्या :

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा, पालघरमध्ये नाना पटोलेंचं मतदारांना आवाहन

पुण्यात भाजप-मनसे युती नाहीच? राज ठाकरे पुन्हा 2 दिवसाचा दौरा करणार, मनसेचा नेमका आकडा किती?

A new city with all facilities will be set up around Shirdi Airport