…तर विशाल पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे; संजय राऊतांच्या विधानाने लक्ष वेधलं

| Updated on: Apr 26, 2024 | 3:00 PM

Sanjay Raut on Vishal Patil Sangli Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी सांगलीच्या जागेवर त्यांनी भाष्य केलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. वाचा सविस्तर...

...तर विशाल पाटलांवर कारवाई झालीच पाहिजे; संजय राऊतांच्या विधानाने लक्ष वेधलं
sanjay raut
Follow us on

लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघांची जोरदार चर्चा होतेय. सांगली मतदारसंघातील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. आता संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील अन् विशाल पाटील या तिघांमध्ये लढत होत आहे. अशात विशाल पाटलांवर पक्षाची शिस्त मोडल्याची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

जर कुणी पक्षाची शिस्त मोडून निवडणूक लढणार असेल. भाजपला मदत व्हावी म्हणून मग ती व्यक्ती काम करत असेल. तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई झाली पाहिजे. शेवटी कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अनिल देसाई आज अर्ज भरणार

अनिल देसाई आज अर्ज भरणार आहेत.त्याच्या आधी ते दर्शनाला आलेत. आज अकोल्यात माझा मेळावा आहे. साईबाबांचे आशीर्वाद घेतले आहेत. मुख्यमंत्री का आले माहिती नाही. आम्ही मात्र साईंचं दर्शन घ्यायला आलो आहे. एकनाथ शिंदे यांचा उमेदवार पाडतोय. आधीच्या 5 आणि आजच्या 8 त्यातील 10 जागा आम्ही जिंकू. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. आमचं सरकार केंद्रात आल्यावर फेररचना केली जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्या नखशिखांत खोटेपणा आहे आणि भ्रष्टाचार आहे. सत्तेच्या काळात दिल्लीत नहराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करुन लोकान त्रास दिला आहे. त्यांना आता भीती वाटत आहे की, मला पण अटक करतील. ते म्हणतात की मला अटक करणार होते अहो तुम्ही गुन्हे केलेत. फोन टॅपिंग केलेत. तुम्ही गुन्हे केले आहेत. मी नाही त्यातली कडी लाव आतली अस कसं चालेल? एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर राजकारणातच दिसणार नाहीत, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.