.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Ulhas Patil | हजारो गावकऱ्यांसह शिवसेना आमदार पुरात अडकले, ना वीज, ना मोबाईल, कोणताही संपर्क नाही

शिरोळचे शिवसेना आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) यांना महापुराचा फटका बसला आहे. आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) हे गावकऱ्यांसह पुरात अडकले आहेत.

MLA Ulhas Patil | हजारो गावकऱ्यांसह शिवसेना आमदार पुरात अडकले, ना वीज, ना मोबाईल, कोणताही संपर्क नाही
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 10, 2019 | 10:50 AM
Share

कोल्हापूर : शिरोळचे शिवसेना आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) यांना महापुराचा फटका बसला आहे. आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) हे गावकऱ्यांसह पुरात अडकले आहेत. शिरोळ तालुक्यातील आलास या गावाचा संपर्क तुटला आहे. कृष्णा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आलास हे गाव आहे. या गावात उल्हास पाटील अनेक गावकऱ्यांसह अडकले असल्याची माहिती कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

या गावात वीज नाही, त्यामुळे मोबाईल सुरु नाहीत, संपर्क साधण्यासाठी यंत्रणा नाहीत. त्याबाबतचा व्हिडीओ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला.

पाण्याला वेग प्रचंड आहे, त्यामुळे तिथे बोट चालत नाही. असंख्य लोक तिथे आहेत, त्यामुळे आमदार उल्हास पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबतच आहेत. ते अनेकांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र नेटवर्क व्यत्ययामुळे त्यांचा संपर्क होत नाही. पहाटे चारच्या सुमारास बुधाजीराव मुळीक यांच्याशी उल्हास पाटलांचा संपर्क झाला आणि त्याबाबतची माहिती मिळाली.

त्यानंतर बुधाजीराव मुळीक यांनी स्वत: प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावरही संपर्क साधून माहिती दिली. त्याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतचा घटनाक्रम सांगितला.

आलास गावातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तिथे एअरलिफ्ट करणे गरजेचं आहे, असं बुधाजीराव मुळीक यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

“हजारो लोक अनेक ठिकाणी अडकून आहेत, जिथे अद्याप कोणाचा संपर्क झालेला नाही. ज्यांची माहिती मिळतेय, त्यांना मदत करण्याची तयारी सुरु होते, पण ज्यांची माहितीच मिळत नाही किंवा ज्यांच्याशी संपर्कच झाला नाही, त्यांचं काय? शिवाय शिरोळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे, तिथून पुढे कर्नाटक सुरु होतं. त्यामुळे कोल्हापुरातील पूर ओसरतो तेव्हा आधीच पाण्यात असलेलं शिरोळ आणखी पाण्यात जातं” असं बुधाजीराव मुळीक यांनी सांगितलं.

कोण आहेत आमदार उल्हास पाटील?

  • उल्हास पाटील हे शिवसेनेचे कोल्हापुरातील शिरोळ मतदारसंघाचे आमदार आहेत.
  • 2014 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले.
  • उल्हास पाटील हे आधी राजू शेट्टी यांचे कट्टर कार्यकर्ते होते, मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
  • शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात उल्हास पाटील हे सहभागी असतात.
  • स्वाभिमानीची सगळी आंदोलन अंगावर घेतलेला साधा माणूस म्हणून उल्हास पाटील यांच्याकडे पाहिलं जातं होतं
  • 2014 मध्ये त्यांनी भगवा खांद्यावर घेऊन शिवसेनेचं तिकीट मिळवलं आणि विक्रमी मताने निवडून आले.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर