प्रताप सरनाईकांचं मुलाला बर्थडे गिफ्ट, बिबट्याचा बछडा दत्तक घेतला

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज (28 डिसेंबर) चिरंजीव पूर्वेशला वाढदिवसानिमित्त थेट बिबट्याचा बछडा भेट म्हणून दिला आहे.

प्रताप सरनाईकांचं मुलाला बर्थडे गिफ्ट, बिबट्याचा बछडा दत्तक घेतला

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज (28 डिसेंबर) चिरंजीव पूर्वेशला वाढदिवसानिमित्त थेट बिबट्याचा बछडा भेट म्हणून दिला आहे. सरनाईक कुटुंबाने ठाण्यात सापडलेल्या बिबट्याच्या बछड्याला दत्तक (Pratab Sarnaik adopt leopard baby) घेतलं आहे. तसेच आपल्या चिरंजीव पूर्वेशच्या वाढदिवशी बछड्याचे नामकरण केले आहे.

हा नामकरण विधी आज बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडला. वडिलांनी दिलेल्या अनोखी भेटीमुळे पूर्वेशही आनंदी झाला. सरनाईक कुटुंबात बिट्टू बॉस (Pratab Sarnaik adopt leopard baby) या नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. यावेळी संपूर्ण सरनाईक कुटुंब आवर्जून उपस्थित राहिले.

राज्य शासनाच्या वन्य प्राणी दत्तक योजनेअंतर्गत नॅशनल पार्कमधील अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही पूर्ण केली. बिबट्या दत्तक घेतल्यामुळे सोशल मीडियावरही सरनाईक कुटुंबीयांचे कौतुक केले जात आहे.

विशेष म्हणजे प्रताप सरनाईक यांचा चिरंजीव पूर्वेशचे टोपन नावही बिट्टू असे आहे. पूर्वेशनेही आपल्या फेसबुक अकाऊटंवर बिट्टू असे नाव आपल्या नावा पूढे ठेवले आहे.


Published On - 4:03 pm, Sat, 28 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI