AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा महिना; संरक्षण मंत्रालयाकडून अनिल अंबानींच्या कंपनीचे 2500 कोटींचे कंत्राट रद्द

गेल्या काही वर्षांमध्ये अनिल धीरूभाई अंबानी समूहातील (ADAG) सर्व कंपन्या तोट्यात असल्याने अनिल अंबानी यांची अवस्था बिकट झाली आहे.

दुष्काळात तेरावा महिना; संरक्षण मंत्रालयाकडून अनिल अंबानींच्या कंपनीचे 2500 कोटींचे कंत्राट रद्द
अनिल अंबानी
| Updated on: Oct 11, 2020 | 11:47 AM
Share

नवी दिल्ली: कर्जाच्या बोझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना आता आणखीन एक मोठा झटका बसला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून अनिल धीरुभाई अंबानी समूहाला (ADAG) देण्यात आलेले 2500 कोटींचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. रिलायन्स नेवल अँण्ड इंजीनियरिंग लिमिटेडला (आरएनईएल) हे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार आरएनईएल भारतीय नौदलाला गस्तीसाठीची जहाजे तयार करुन देणार होती. मात्र, ‘आरएनईएल’ला नियोजित वेळेत ही जहाजे देता आली नाहीत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने आरएनईएल कंपनीचे कंत्राटच रद्द केले. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालायने दोन आठवड्यांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. (Defence Ministry Cancels Reliance Naval contract)

2011 साली झालेला करार नौदलाला गस्तीसाठीची पाच जहाजे पुरवण्यासाठी रिलायन्स आणि नौदलामध्ये 2011 साली करार झाला होता. यानंतर रिलायन्सकडून गुजरातमधील जहाज बांधणीचा कारखाना खरेदी करण्यात आला. परंतु, यानंतर रिलायन्सला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

आरएनईएल कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर अनिल अंबानी यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांप्रमाणे रिलायन्स नेवल अँण्ड इंजीनियरिंग लिमिटेडही (आरएनईएल) कर्जाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने ‘आरएनईएल’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसही मंजुरी दिली होती. या कंपनीच्या डोक्यावर साधारण 43,587 कोटींचे कर्ज आहे.

आरएनईएल खरेदी करण्यास अनेक कंपन्या उत्सुक दिवाळखोरीत निघालेल्या रिलायन्स नेवल अँण्ड इंजीनियरिंग लिमिटेड (आरएनईएल) खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. यामध्ये एपीएम टर्मिनल्स, यूनाइटेड शिपबिल्डिंग कॉरपोरेशन (रूस), हेजल मर्केंटाइल लिमिटेड, चौगुले ग्रुप, इंटरप्स (अमेरिका), नेक्स्ट ऑर्बिट वेंचर्स, एआरसीआईएल, आईएआरसी, जेएम एआरसी, सीएफएम एआरसी, इन्वेंट एआरसी और फियोनिक्स एआरसी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

वकिलाची फी देण्यासाठी अनिल अंबानींना विकावे लागले होते घरातील दागिने 

गेल्या काही वर्षांमध्ये अनिल धीरूभाई अंबानी समूहातील (ADAG) सर्व कंपन्या तोट्यात असल्याने अनिल अंबानी यांची अवस्था बिकट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वकिलाची फी देण्यासाठी घरातील सर्व दागिने विकून टाकल्याची माहिती समोर आली होती. तसेच दैनंदिन खर्चासाठीही आपण मुलाकडून कर्ज घेतल्याची माहिती अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयात दिली होती. माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे. तसेच मी सध्याच्या घडीला अत्यंत साधे जीवन जगत असल्याचा दावा अनिल अंबानी यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

कर्ज फेडण्यास असमर्थ, Yes बँकेकडून अनिल अंबानी ग्रुपचं मुख्यालय टेकओव्हर

अनिल अंबानी कंगाल; वकिलाला फी देण्यासाठी दागिनेही विकले!

ठाकरे-अंबानी कुटुंब: भावांचे वाद आणि चक्रावून टाकणारे योगायोग

मुकेश अंबानींची अनिल अंबानींना 462 कोटींची मदत, तुरुंगवारी टळली

(Defence Ministry Cancels Reliance Naval contract)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.