इंदोरीकर महाराजांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांचं मोठं विधान

इंदूरीकर महाजारांच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर सिंधूताई सपकाळ यांनी खंत व्यक्त केली (Sindhutai sapkal on Indurikar Maharaj statement).

इंदोरीकर महाराजांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 9:51 AM

मुंबई : काही पौराणिक दाखले देत असताना कीर्तनकार इंदोरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील. त्याचं इतकं का भांडवल करताय? असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवला आहे (Sindhutai Sapkal on Indurikar Maharaj). इंदोरीकर महाजारांच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर सिंधूताई सपकाळ यांनी खंत व्यक्त केली.

सिंधूताईंचा इंदूरीकर महाराज आणि टीकाकऱ्यांना सल्ला

“इंदोरीकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरु ठेवावं”, असा सल्ला सिंधूताईंनी इंदोरीकरांना दिला आहे (Sindhutai Sapkal on Indurikar Maharaj). याशिवाय टीका करणाऱ्यांनाही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा, असा सल्ला सिधूताईंनी दिला.

इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त

दरम्यान, सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.