VIDEO : औरंगाबाद-जालना महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू

औरंगाबाद-जालना महामार्गावर एक भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृत्यू झालेल्या सहा जणांपैकी पाच जण हे एकाच कुटुंबातील आहेत.

VIDEO : औरंगाबाद-जालना महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना महामार्गावर एक भीषण अपघात घडला (Car and Auto Rickshaw Accident). या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे (Six Died In Accident). दुर्दैवी बाब म्हणजे मृत्यू झालेल्या सहा जणांपैकी पाच जण हे एकाच कुटुंबातील आहेत. शिवाय, या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (25 डिसेंबर) बदनापूरपासून 8 किमी अंतरावर घडला (Road Accident). अपघातातील चारही जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे (Six Died In Accident).

औरंगाबादकडून जालन्याकडे विरुद्ध दिशेने जात असलेल्या भरधाव टोयोटा कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने समोरुन येत असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षा आणि रिक्षात बसलेले लोक काही फुटापर्यंत हवेत उडाले. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आणि कारचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात रिक्षात बसलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. सर्वच मृतक हे जालन्यातील रहिवासी आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात जालना येथील रहिवासी दिनेश रामलाल जाधव (वय-32) , रेणुका दिनेश जाधव (वय-25), वंदना गणेश जाधव (वय-27), सोहम गणेश जाधव (वय-9), अतुल दिनेश जाधव (वय-6 महिने) यांचा मृत्यू झाला. हे सर्व ऑटो रिक्षामध्ये औरंगाबादकडे जात होते. त्यातच बदनापूर पासून 8 किमी अंतरावर औरंगाबादहून जालनाकडे जाणाऱ्या टोयोटा कारची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की ऑटो रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला.

औरंगाबाद-जालना महामार्गावरील अमृतसर ढाब्याजवळ पेट्रोल पंप आहे. या पंपावर जाण्यासाठी दुभाजकामध्ये रस्ता आहे. या रस्त्याजवळ टोयोटा कार भरधाव वेगात आली आणि दुभाजकावरून विरुद्ध दिशेला वळली. त्याचवेळी समोरून ही रिक्षा येत होती. या कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रिक्षावर जाऊन आदळली आणि हा भीषण अपघात घडला.

Six Died in Auranagabad-Jalna Highway Accident

पाहा व्हिडीओ : 

Published On - 11:30 pm, Wed, 25 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI