Railway : छोट्या व्यापाऱ्यांना होणार मोठा फायदा, रेल्वीची ही नवी योजना पाहिलीत का?

| Updated on: Nov 27, 2021 | 11:15 AM

भारतीय रेल्वने लाकडांची वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. उत्तर रेल्वेने पहिल्यांदाचा मोठ्या प्रमाणात लाकडांची वाहतूक केली आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.

Railway : छोट्या व्यापाऱ्यांना होणार मोठा फायदा, रेल्वीची ही नवी योजना पाहिलीत का?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर रेल्वे पुन्हा कात टाकतेय. रेल्वेने अनेक बंद केलेल्या सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याचा जरूर फायदा घ्या. रेल्वेने नफा वाढवण्यासाठी प्रवासी संख्या वाढवली आहे. त्यातबरोबर प्लॅटफोर्म तिकीटही कमी केलं आहे. रेल्व सध्या मालवाहतुकीतूनही मोठा नफ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

रेल्वेमधून पहिल्यांदाच लाकडाची वाहतूक

भारतीय रेल्वने लाकडांची वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. उत्तर रेल्वेने पहिल्यांदाचा मोठ्या प्रमाणात लाकडांची वाहतूक केली आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. यातून उत्तर रेल्वला जवळपास 1 लाख 39 हजारांचा महसूल मिळाला आहे. रेल्वेने पुन्हा सुविधा वाढवल्यानं अनेक व्यापाऱ्यांना आपला माल देशभरात कुठेही पाठवण्यात मदत होणार आहे.

रेल्वेच्या इतर योजनांचाही फायदा घ्या

रेल्वे फक्त प्रवावासाठीच नाही तर रेल्वेच्या इतरही काही चांगल्या योजना आहेत त्याचा फायदा घ्या. अलिकडच्याच काळात रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हा किंवा एखाद्या कंपनीला रेल्वे भाड्यानं घेता येते. या योजनेला रेल्वेने भारत गौरव योजना नाव दिलं आहे. रेल्वे भाड्यानं घेताना कमीत कमी दोन वर्षांचा करार असेल. हा करार डब्यांचं जेवढं आयुष्य आहे, म्हणजे साधारण 35 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. ज्या कंपनीनं रेल्वे भाड्यानं घेतली आहे ती कंपनी मालवाहतुकीसाठी डब्यांमध्ये हवे तसे बदल करून घेऊ शकते. अनेक कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठीही रेल्वेच्या काही खास योजना आहेत.

दोन महिन्यांपासून माझ्यावर, माझ्या नातवांवरही पाळत, हेरगिरी करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करणार: नवाब मलिक

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संकट, सरकारसोबत चर्चेनंतर BCCI निर्णय घेणार

शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीवर जोर, द्वैभाषिक धोरण लागू करण्याचे वर्षा गायकवाडांचे निर्देश