कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संकट, सरकारसोबत चर्चेनंतर BCCI निर्णय घेणार

मुंबई : 2020 हे वर्ष कोरोना व्हायरसने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. लोकांना जवळपास 10 महिन्यांहून अधिक काळ बंद घरांमध्ये राहावं लागलं. संपूर्ण जगाला याचा मोठा फटका बसला. भारतात या आजारामुळे सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जगभरात 52 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. हा आजार पसरल्यानंतर जवळपास वर्षभराने त्यावरील प्रभावी लस तयार […]

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संकट, सरकारसोबत चर्चेनंतर BCCI निर्णय घेणार
Indian Team
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 11:13 AM

मुंबई : 2020 हे वर्ष कोरोना व्हायरसने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. लोकांना जवळपास 10 महिन्यांहून अधिक काळ बंद घरांमध्ये राहावं लागलं. संपूर्ण जगाला याचा मोठा फटका बसला. भारतात या आजारामुळे सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जगभरात 52 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. हा आजार पसरल्यानंतर जवळपास वर्षभराने त्यावरील प्रभावी लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. तसेच या रोगाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने जनजीवन सुरळीत होऊ लागलं आहे. दरम्यान, आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट आढळला आहे. (India’s Tour Of South Africa: BCCI waiting for Centre’s Decision Over New COVID Variant)

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा परिणाम विविध गोष्टींवर होत आहे. या नवीन व्हेरिएंटनंतर दक्षिण आफ्रिकेचे सरकार हाय अलर्टवर गेले आहे. देशात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराही धोक्यात येऊ शकतो. त्यानंतर यूके सरकारने दक्षिण आफ्रिका आणि इतर पाच दक्षिण आफ्रिकन देशांमधून होणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर त्या देशांतून नुकत्यात आलेल्या प्रत्येकाची कोविड-19 चाचणी करावी लागेल.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

टीम इंडियाला 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच, भारताचा अ संघ सीनियर संघापूर्वीच तिथे गेला आहे. जिथे त्यांना चार दिवसीय सराव सामने खेळायचे आहेत. दोन्ही देशांमध्ये असे तीन सामने खेळवले जाणार आहेत. सीनियर संघात निवडलेल्या अनेक खेळाडूंना भारत अ संघात स्थान मिळाले आहे, जेणेकरुन त्यांना तिथल्या परिस्थितीची जाणीव व्हावी.

दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतातील तरुणांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नवीन व्हेरिएंट दिसल्याने गेल्या चार-पाच दिवसांत तिथल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. B.1.1529 म्हणून ओळखला जाणारा नवीन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेहून बोत्सवाना आणि हाँगकाँगला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये देखील आढळला आहे.

सरकारच्या सल्ल्यानंतर बीसीसीआय निर्णय घेणार

भारताच्या दौऱ्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कोणताही निर्णय लवकरच घेतला जाईल. हा निर्णय पूर्णपणे सरकारच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल. भारत अ संघ सध्या ब्लूमफॉन्टेन येथे तीन अनधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जो अनिश्चित परिस्थितीमुळे रद्द केला जाऊ शकतो, कारण विविध खेळाडूंना सध्या दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडायचे आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिक दौरा

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी : 17-21 डिसेंबर : वाँडरर्स, जोहान्सबर्ग
  • दुसरी कसोटी : 26-30 डिसेंबर : सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
  • तिसरी कसोटी : 3-7जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन

एकदिवसीय मालिका

  • पहिली वनडे : 11 जानेवारी : बोलंड पार्क, पार्ल
  • दुसरी वनडे : 14 जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन
  • तिसरी वनडे : 16 जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन

टी-20 मालिका

  • पहिला T20 सामना : 19 जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन
  • 2रा T20 सामना : 21 जानेवारी : न्यूलँड्स, केपटाऊन
  • तिसरा T20 सामना : 23 जानेवारी : बोलंड पार्क, पार्ल
  • चौथा T20 सामना : 26 जानेवारी : बोलंड पार्क, पार्ल

इतर बातम्या

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल

Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?

(India’s Tour Of South Africa: BCCI waiting for Centre’s Decision Over New COVID Variant)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.