तृप्ती देसाईंनी अकोल्यात येऊन दाखवावं, मुंडन करुन परत पाठवू : स्मिता आष्टेकर

‘भूमाता ब्रिगेड’च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं, त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, अशी टीका अकोल्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी केली (Smita Ashtekar slams Trupti Desai).

तृप्ती देसाईंनी अकोल्यात येऊन दाखवावं, मुंडन करुन परत पाठवू : स्मिता आष्टेकर

अहमदनगर : ‘भूमाता ब्रिगेड’च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं, त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, अशी टीका अकोल्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी केली आहे (Smita Ashtekar slams Trupti Desai). कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निषेध सभा आयोजित करण्यात आली. स्मिता आष्टेकर यांनी या सभेत इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांना संबोधित करताना तृप्ती देसाईंवर खालच्या पातळीवर टीका केली.

“तृप्ती देसाई यांनी कालही नगर जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. तृप्ती देसाई नगर जिल्ह्यात जेव्हा आल्या तेव्हा इतका मोठा फौजफाटा घेऊन आल्या की त्यांच्या मागे आणि पुढे पोलीस प्रशासन उभं होतं. हे त्यांनी फक्त एक स्मिता आष्टेकरला थांबवण्यासाठी केलं. मात्र मला प्रत्येक स्त्रीमध्ये स्मिता आष्टेकर दिसते. आता सांगते दम असेल तर अकोल्यात येऊन दाखवा मुंडन करुन परत पाठवू”, असं स्मिता आष्टेकर म्हणाल्या.

“तृप्ती देसाई विरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत. प्रशासनाने त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवावं”, अशीदेखील मागणी यावेळी स्मिता आष्टेकर यांनी केली.

स्मिता आष्टेकर यांनी याअगोदरही सोशल मीडियाच्या माध्यमातून तृप्ती देसाई यांच्यावर टीका करत अहमदनगरमध्ये येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं (Smita Ashtekar slams Trupti Desai).

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनासाठी अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. महाराजांचं मुळगाव असलेल्या इंदोरीतून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. टाळ आणि मृदुंगच्या गजरात भजन-कीर्तन करत इंदोरीकर महाराजांना समर्थन देण्यात आलं. तृप्ती देसाई यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी इंदोरीतील महिलांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI