Ashram Controvery | बॉबी देओल अभिनित ‘आश्रम’ मोठ्या वादात, प्रकाश झांविरोधात करणी सेनेची तक्रार!

Harshada Bhirvandekar

Harshada Bhirvandekar |

Updated on: Nov 18, 2020 | 12:49 PM

सोशल मीडियावर देखील बुधवारी ‘#शर्म_करो_प्रकाश_झा’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. बऱ्याच वापरकर्त्यांनी ट्विट करत या वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Ashram Controvery | बॉबी देओल अभिनित ‘आश्रम’ मोठ्या वादात, प्रकाश झांविरोधात करणी सेनेची तक्रार!
काशीपुरवाल्या निराला बाबांची ही कथा आणखी पुढे सरकणार आहे. आता या मालिकेचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : करणी सेनेने निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता बॉबी देओल अभिनित आणि प्रकाश झा निर्मित ‘आश्रम’ (Ashram 2) या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाला करणी सेनेने (Karni Sena) विरोध दर्शवला आहे. वेब सीरीजच्या प्रदर्शनानंतर करणी सेनेने निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याने या वेब सीरीजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणी सेनेने केली आहे (Social Media users trending hashtags for ban ashram 2 after karni sena files FIR).

सोशल मीडियावर देखील बुधवारी ‘#शर्म_करो_प्रकाश_झा’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. बऱ्याच वापरकर्त्यांनी ट्विट करत या वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या आधीही करणी सेनेने, या वेब सीरीजमधून धार्मिक परंपरा, आश्रम धर्म, प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे म्हणत ‘एमएक्स प्लेयर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला आणि प्रकाश झा यांना नोटीस पाठवली होती.

(Social Media users trending hashtags for ban ashram 2 after karni sena files FIR)

वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनानंतर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

करणी सेनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांच्या वकिलाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ‘प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ नावाच्या वेब सीरीजमुळे लोकांच्या भावनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही वेब सीरीज येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल नकारात्मकता पसरवणारी ठरणार आहे’, असे करणी सेनेने म्हटले आहे (Social Media users trending hashtags for ban ashram 2 after karni sena files FIR).

(Social Media users trending hashtags for ban ashram 2 after karni sena files FIR)

जौनपूर कोर्टात याचिका

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल अभिनित ‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रित केल्याचा आरोप करत दिवाणी कोर्टाच्या वकिलाने जौनपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता (Ashram Chapter 2 Controversy).  त्यानंतर त्यांनी अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) आणि दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटलाही दाखल केला गेला. जौनपूर दिवाणी कोर्टाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी गुरुवारी (12 नोव्हेंबर) अधिवक्ता उपेंद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता.

या अर्जात हिमांशू यांनी म्हटले की, ‘सनातन धर्मावर माझा खूप विश्वास आहे. लहानपणापासूनच आम्हाला आश्रम आणि पवित्र हिंदू ग्रंथ माहित आहे आणि आम्ही त्याबद्दल खूप ऐकले आहेत. आश्रम हे ऋषीमुनींचे पवित्र स्थान असल्याचे म्हटले जाते. सुसंघटित आश्रम संस्था हे भारतातील वैशिष्ट्य आहे. ‘आश्रम चॅप्टर-2’मध्ये निर्दोष लोकांना आश्रमावरील श्रद्धेच्या नावाखाली कसे गुंडाळले जाते, गुन्हेगारी आणि राजकारणाची युती कशी आहे, आश्रमांमध्ये व्यभिचार आणि मादक पदार्थांचा व्यापार इत्यादी कसे चालतात, हे दाखवले गेले आहे, जे चुकीचे आहे.’

(Social Media users trending hashtags for ban ashram 2 after karni sena files FIR)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI