वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांचा धिंगाणा, मुलींच्या कपड्यावर अश्लील लेखन, सोलापुरातील प्रकार

| Updated on: Sep 27, 2020 | 4:32 PM

मुलींच्या वसतिगृहातील आयसोलेशन सेंटरमध्ये धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. (Solapur Hostel quarantine center Patient Write obscene words With contact no)

वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांचा धिंगाणा, मुलींच्या कपड्यावर अश्लील लेखन, सोलापुरातील प्रकार
Follow us on

बीड : मुलींच्या वसतिगृहातील आयसोलेशन सेंटरमध्ये धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या वसतिगृहातील मुलींच्या कपड्यावर अश्लील लिखाण लिहिण्यात आलं आहे. तसेच या ठिकाणच्या वस्तूंची पळवापळव करुन कागदपत्रही फाडण्यात आले. सोलापुरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Solapur Hostel quarantine center Patient Write obscene words With contact no)

राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. रुग्णांना जागा कमी पडत असल्यामुळे राज्यातील अनेक वसतिगृहांचा उपयोग कोव्हिड सेंटरसाठी करण्यात येत आहेत. मात्र सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर येथील मुलींच्या वसतिगृहात किळसवाना प्रकार समोर आला आहे.

या ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्या कपड्यावर स्वतःचा फोन नंबर लिहून त्यावर अश्लील लिखाण करण्यात आले आहे. एवढंच नाही तर त्यांची महत्वाची वस्तू आणि सामानांची चोरी करण्यात आली. तसेच काही महत्वाची कागदपत्रे देखील फाडून टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हा सर्व प्रकार तिथं आयसोलेशनमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेनी मोबाईलमध्ये चित्रित करून एका मुलीला पाठविला आहे. या हॉस्टेलमध्ये दारुच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.

इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीत अक्षरशः लघुशंका करून कपाटात ठेवण्यात आले आहेत. काही मुलींच्या लॅपटॉपमध्ये त्यांचा खासगी डाटा आहे. त्याचा दुरुपयोग करण्याची भीती मुलींनी व्यक्त केली आहे.

हा सर्व प्रकार भीषण आणि किळसवाणा आहे. त्यामुळे पाच दिवसांपूर्वी तिथं आलेल्या रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बीडच्या मुलींनी केली आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. हा प्रकार अत्यंत भीषण असून तिथं आतापर्यंत किती पुरुष रुग्ण होते याची माहिती घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्याशिवाय मुलींचे शैक्षणिक उपकरणे आणि कागदपत्रे ताब्यात घ्यावीत अशी मागणी देसाई यांनी केलीय. लवकर कारवाई झाली नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिला आहे.(Solapur Hostel quarantine center Patient Write obscene words With contact no)

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या संकटाने हाल; दागिने गहाण ठेवून घोड्यांची देखभाल

Wardha| सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद पोलिसात, कार्यालयाला कुलूप, महादेव विद्रोहींची हकालपट्टी