कोरोनाच्या संकटाने हाल; दागिने गहाण ठेवून घोड्यांची देखभाल

यवतमाळ जिल्ह्यात कित्येक जण गेल्या अनेक वर्षांपासून घोडे भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहेत. हे व्यावसायिक लग्नामध्ये वरासाठी लागणारे घोडे भाड्याने देतात. पाच ते सहा महिने हा व्यवसाय करून १० ते १२ लाखाची कमाई करतात.

कोरोनाच्या संकटाने हाल; दागिने गहाण ठेवून घोड्यांची देखभाल

यवतमाळ: कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना अनेकप्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. यवतमळामध्ये घोडे भाड्याने देणाऱ्या बग्गीवाल्यांचे तर या संकटामुळे पुरते कंबरडे मोडले आहे. गेल्या साडेपाच घोडे जाग्यावरच बांधण्यात आल्याने बग्गीवाल्यांचं उत्पन्न थांबलं आहे. परिणामी घरातील दागिणे गहाण ठेवून बग्गीवाल्यांना घोड्यांची देखभाल करावी लागत आहे. (Horse merchants suffer)

यवतमाळ जिल्ह्यात कित्येक जण गेल्या अनेक वर्षांपासून घोडे भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहेत. हे व्यावसायिक लग्नामध्ये वरासाठी लागणारे घोडे भाड्याने देतात. पाच ते सहा महिने हा व्यवसाय करून १० ते १२ लाखाची कमाई करतात. याच भरोशावर घरगूती कार्य, सण, मुलांचे शिक्षण आदी गोष्टी पार पाडल्या जातात. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. इतर व्यावसायिकांप्रमाणे त्यांच्यातही स्पर्धा असते. आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करणारे घोडे असावे म्हणून हे व्यावसायिक धुळे, मालेगावहून ३ ते ४ लाख रुपये किंमतीचे घोडे खरेदी करतात. त्यांना इशाऱ्यावर नाचने शिकवतात. आता या वर्षी हे सर्व घोडे लग्नसराई नसल्या कारणामुळे घरीच उभे आहेत. एक घोड्याचा दिवसाला किमान दोनशे रुपये खर्च आहे. परंतु, आता हा खर्च सहन होत नाही. काही घोडे मालकांनी तर घरातील दागिने गहाण ठेऊन घोडयांसाठी धान्य खरेदी करून त्यांना जगवत आहेत.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. परिणामी व्यावसायिकांची दैनावस्था झाली आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची तर अतोनात हाल झाले आहेत. इतर व्यावसायिकांप्रमाणेच लॉकडाऊनचा फटका बग्गीवाल्यांना सुद्धा सहन करावा लागला. याच व्यवसायाच्या भरोशावर वर्षभर कुटुंबाची देखल भलं करावी लागते. आता व्यवसाय पूर्णपणे बंद असल्या कारणाने महिलांना घर सांभाळणे कठीण झाले आहे, असं इस्माईलभाई घोडेवाले यांनी सांगितलं. तर, एकंदरीत लॉकडाउनच फटका बग्गीवाल्यांना चांगलाच बसला. त्यांना आपले घोडे जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं रमजान भाई यांनी सांगितलं. (Horse merchants suffer)

 

संबंधित बातम्या:

अनिल अंबानी कंगाल; वकिलाला फी देण्यासाठी दागिनेही विकले!

मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा

(Horse merchants suffer)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *