‘सोनी’ वाहिनीला उपरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल जाहीर माफी

| Updated on: Nov 08, 2019 | 12:42 PM

केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल 'सोनी वाहिनी'ने सपशेल माफी मागितली आहे

सोनी वाहिनीला उपरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल जाहीर माफी
Follow us on

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने सपशेल माफी मागितली आहे. स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा उल्लेख केल्यामुळे (Sony TV on KBC11 Shivaji Maharaj Row) सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.

‘केबीसी’तील बुधवारच्या भागात दुर्लक्षातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा संदर्भ दिला गेला. आम्ही या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेत आम्ही कालच्या भागात खेद व्यक्त करण्यासाठी एक स्क्रोल चालवला होता’ असं ट्वीट सोनी वाहिनीच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आलं आहे.

या ट्वीटसोबत स्क्रोल चालवल्याचा व्हिडीओही शूट करुन पोस्ट करण्यात आला आहे. तर केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनाही टॅग करण्यात आलं आहे. शिवरायांच्या एकेरी उल्लेखाबद्दल चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्याही माफीची मागणी केली होती. त्यामुळे बिग बी आता काय भूमिका (Sony TV on KBC11 Shivaji Maharaj Row) घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

काय आहे प्रकरण?

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये गुजरातची शाहेदा चंद्रन ही स्पर्धक हॉटसीटवर बसली होती. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते.

ए. महाराणा प्रताप
बी. राणा सांगा
सी. महाराजा रणजीत सिंह
डी. शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींच्या माफीनाम्याची मागणी

प्रश्नाचे पर्याय वाचताना अमिताभ बच्चन यांना ही चूक दुरुस्त करता आली असती, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणं साहजिकच कोणालाही रुचलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरुन प्रेक्षकांसह अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.

जर औरंगजेबाच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ हा शब्द लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का? असा प्रश्न विचारला (Sony TV on KBC11 Shivaji Maharaj Row) जात आहे.