AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार, 1 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. (ST worker get their salary before Diwali announced by Anil Parab)

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार, 1 हजार कोटींचे पॅकेज जाहीर
| Updated on: Nov 10, 2020 | 6:46 PM
Share

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या  पगारासाठी सरकारकडून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या तीन महिन्यांपासून थकला आहे. या तिन्ही महिन्यांचे थकित वेतन हे दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले. (ST worker get their salary before Diwali announced by Anil Parab)

राज्यातील एस टी च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अतिशय गंभीर होता. त्यांना वेतन मिळायला हवं ही माझी आग्रहाची मागणी होती. त्यांच्यासाठी पैशाची जमवाजमव करणे कठीण होते. कालच एक महिन्याच्या थकीत वेतन आणि अग्रीम रक्कम दिली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतंच अनिल परब आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर यावर योग्य तो मार्ग काढण्यात आला आहे.

या बैठकीत वेगवेगळे विषयांची चर्चा केली गेले. त्यानुसार राज्य सरकारकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे एसटी महामंडळाला नक्कीच फायदा होईल, असेही अनिल परब म्हणाले.

टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे 3 हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली.

या कारणामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे असल्याचेही अनिल परब यांनी सांगितले.

(ST worker get their salary before Diwali announced by Anil Parab)

संबंधित बातम्या : 

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार, ST कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...