पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेतील बदलांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेतील बदलांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुणे: पुण्यातील हजारो विद्यार्थ्यांनी पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांविरोधात आज मोर्चा काढला. पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.हे विद्यार्थी 11 तारखेपर्यंत उपोषणाला बसणार आहेत. तर मोर्चातील 50 विद्यार्थी मुंबईपर्यंत धावणार आहेत. मुख्यमंत्र्यांना धावत जाऊन आपलं निवेदन देणार आहेत.

पोलीस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती.त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जात असे. अशाप्रकारे 200 गुणांतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची निवड केली जात असे. पण आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला असून, लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. शिवाय मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले आहेत.

मात्र या दोन्ही बदलांना पोलीस होऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुण – तरुणींनी विरोध केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात पोलिसांच्या फक्त रिक्त जागा भरल्या जात आहेत. नविन पोलिस भरती झालेली नाही. त्यामुळे पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आंदोलन करणारे हे तरुण – तरुणी पुण्यातुन मुंबईला धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र महामार्गावरुन धावत जाण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे या तरुण -तरुणींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही विद्यार्थी मुंबईपर्यंत जाणार आहेत.

संबंधित बातम्या 

पोलीस भरतीच्या नियमात बदल, आता लेखी परीक्षा अगोदर होणार!  

मेगाभरतीपूर्वी विश्वास नांगरे पाटलांकडून तरुणांना यशाचा मंत्र  

ऐतिहासिक! आर्मीमध्ये महिलांना 20 टक्के जागा राखीव 

Published On - 2:14 pm, Thu, 7 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI