मुस्लिम बांधवांकडून अयोध्या निकालाचे स्वागत, दुर्गामातेची आरती करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

| Updated on: Nov 10, 2019 | 9:47 AM

अयोध्येच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना सांगलीत मुस्लिम बांधवांकडून दुर्गामातेची पूजा करण्यात (Ayodhya case Verdict Celebration) आली.

मुस्लिम बांधवांकडून अयोध्या निकालाचे स्वागत, दुर्गामातेची आरती करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
Follow us on

सांगली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय (Ayodhya case verdict Celebration) दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना बहाल करण्यात आली. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना सांगलीत मुस्लिम बांधवांकडून दुर्गामातेची पूजा करण्यात आली. यावेळी मुस्लिम महिला आणि पुरुषांनी एकत्रित दुर्गामातेची आरती करत सामाजिक (Ayodhya case Verdict Celebration) संदेश दिला.

रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्यासह देशभरात सर्व जाती-धर्मातील लोकांनी स्वागत केले. या पार्श्वभूमीवर सांगलीतील मुस्लिम महिला आणि पुरुषांनी दुर्गामाता मंदिरातील दुर्गामातेची पूजा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी आरती करत हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेशही दिला. यावेळी भाजपचे मुस्लिम सेलचे अध्यक्ष मुन्ना कुरणे उपस्थित होते.

यावेळी मुस्लिम बांधवांनी दुर्गामातेची आरती करत देशात शांतता आणि अखंड एकता राहण्यासाठी प्रार्थना केली. मुस्लिम महिलेच्या हाती आरतीचे ताट देऊन त्यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. यावेळी मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले (Ayodhya case Verdict Celebration) आहे.

देशाची अखंडता टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचे विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटनांनीही स्वागत केले.

अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने एतिहासिक असा निर्णय दिला. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची, वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे.