Sushant Singh Death Case | “रियाला 2017 मध्ये भेटलो” हॉटेलियर गौरव आर्याला ईडीचे समन्स

सीबीआयच्या रडारवर असलेली सुशांतची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांचे जुने संबंध असलेल्याचे ईडीच्या तपासात चॅट्समधून उघड झाले

Sushant Singh Death Case | रियाला 2017 मध्ये भेटलो हॉटेलियर गौरव आर्याला ईडीचे समन्स
अनिश बेंद्रे

|

Aug 30, 2020 | 4:25 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने हॉटेलियर गौरव आर्याला समन्स बजावले आहे. गोव्यात असलेला गौरव आर्या चौकशीसाठी मुंबईत येणार आहे. (Sushant Singh Rajput Death Case Gaurav Arya summoned by ED)

गौरव आर्या याला उद्या (सोमवार 31 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. गौरव आर्या रविवारी दुपारी तीन वाजताच्या फ्लाईटने निघून गोव्याहून मुंबईत येत आहे. टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव आर्या गोव्यातील अंजुना भागात असलेल्या आपल्या हॉटेलमध्ये होता.

सीबीआयच्या रडारवर असलेली सुशांतची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांचे जुने संबंध असलेल्याचे ईडीच्या तपासात चॅट्समधून उघड झाले. त्यानंतर ईडीने गौरवलाही चौकशीसाठी पाचारण केले आहे.

“माझा या खटल्याशी काही संबंध नाही. मी सुशांतसिंह राजपूतला कधी भेटलो नाही. मी तिला (रिया) 2017 मध्ये भेटलो होतो” अशी माहिती गौरवने गोवा विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

गौरव आर्या हा गोव्यातील वागाटेरमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीतील आरोपी आहे. गौरवसोबत बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान आणि 19 जणांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

रियाचे गौरवसोबत काय संबंध आहेत, त्याचे सुशांतच्या आत्महत्येशी संबंध आहेत का, गौरव आणि रियामध्ये ड्रग्ज संबंधित पैशांचा व्यवहार झालाय का, याचा ईडीकडून तपास होणार आहे.

सीबीआय तपासात आज काय काय?

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाचा आजचा दहावा दिवस

रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी

सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास सीबीआय अधिकारी चार वाहनांतून डीआरडीओ गेस्ट हाऊसला

रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक 10.15 वाजताच्या सुमारास स्वतःच्या घरुन निघाले

(Sushant Singh Rajput Death Case Gaurav Arya summoned by ED)

मुंबई पोलिसांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेत रिया आणि शौविक राखाडी रंगाच्या इनोव्हामधून निघाले

रियाने काळ्या रंगाचा मास्क आणि अंगावर काळ्या रंगाचा हुडी परिधान केला

रिया, शौविक आणि सॅम्युअल मिरांडाही साधारण सकाळी 10.30 वाजता डीआरडीओमध्ये

दुपारी 12.30 च्या सुमारास सिद्धार्थ पिठाणी डीआरडीओमध्ये

रिया, शौविक, नीरज, सॅम्युअल मिरांडा यांची डीआरडीओमध्ये सीबीआय चौकशी

सुशांतच्या बहिणी प्रियंका, मीतू आणि तिचे पती सिद्धार्थ यांचीही सीबीआय चौकशी करण्याची चिन्हं आहेत

(Sushant Singh Rajput Death Case Gaurav Arya summoned by ED)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें