अमित शाहांना विमानतळावर भेटले, पण भाजप कार्यालयात एकत्र गेले नाहीत, सुशील कुमार मोदी खरंच नाराज?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी नाराज असल्याच्या चर्चा बिहारच्या गल्लोगल्लीत सुरु आहेत (Sushil Kumar Modi was upset).

अमित शाहांना विमानतळावर भेटले, पण भाजप कार्यालयात एकत्र गेले नाहीत, सुशील कुमार मोदी खरंच नाराज?

पाटणा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी नाराज असल्याच्या चर्चा बिहारच्या गल्लोगल्लीत सुरु आहेत. जेडीयू नेते नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश यांच्यासह एनडीएच्या 14 नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज (16 नोव्हेंबर) पार पडला. या शपथविधी कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस पाटण्यात दाखल झाले (Sushil Kumar Modi was upset).

सुशील कुमार मोदी विमानतळावर अमित शाह यांच्या स्वागतासाठी गेले. पण त्यानंतर ते अमित शाह यांच्यासोबत भाजप कार्यालयात गेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये काल (15 नोव्हेंबर) सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या हालचाली सुरु होत्या त्या प्रक्रियेत सुशील कुमार मोदी कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण सुशील कुमार नाराज नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात येत आहे (Sushil Kumar Modi was upset).

बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री

दरम्यान, नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जेडीयूचे 6, भाजपचे 5, तर ‘हम’ आणि व्हीआयपी पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमारांच्या या मंत्रिमंडळात सुशीलकुमार मोदी यांना स्थान न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, कालच्या बैठकीत तारकिशोर प्रसाद यांची भाजपचा विधीमंडळ नेता तर रेणू देवी यांची उपनेतापदी निवड झाल्यानंतर सुशील कुमार मोदी यांनी त्यांचे ट्विटरवर अभिनंदन केले होते. त्याचबरोबर कार्यकर्तापद कुणीही हिसकवू शकत नाही, असं सूचक ट्विट त्यांनी केलं होतं.

नितीश कुमार यांच्यासोबत कोणी शपथ घेतली

जेडीयू

 1. विजय चौधरी
 2. विजेंद्र यादव
 3. अशोक चौधरी
 4. मेवालाल चौधरी
 5. शीला मंडल

भाजप

 1. तारकिशोर प्रसाद
 2. रेणुदेवी
 3. अमरेंद्र प्रताप सिंह
 4. मंगल पाण्डेय
 5. रामसूरत राय
 6. रामप्रीत पासवान
 7. जीवेश मिश्रा

हम

1. संतोष मांझी

वीआयपी

1. मुकेश सहनी

मंत्रिमंडळात किती मंत्री असणार?

243 सदस्यांच्या विधानसभेत संविधानिक प्रावधानानुसार 15 टक्के सदस्यांना मंत्रिपद देता येऊ शकते. त्यानुसार बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 36 मंत्री असतील. एनडीएनला विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या असून भाजपला सर्वाधिक म्हणजे 74 जागा आहेत. त्यापाठोपाठ जेडीयूला 43, तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी चार-चार जागा आहेत.

कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदं मिळतील, तर जेडीयूच्या वाट्याला बारा मंत्रिपदं येण्याची चिन्हं आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल. नितीश कुमार स्वतः मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याने जेडीयूतील अकरा नेत्यांना मंत्रिपदं मिळतील.

बिहारमधील पक्षीय बलाबल

भाजप – 74
जेडीयू – 43
आरजेडी – 75
काँग्रेस – 19
एमआयएम – 05
CPI (ML) – 12
CPI (अन्य) – 4
हिंदुस्तान आवाम मोर्चा – 04
विकासशील इन्सान पार्टी – 04
अपक्ष/इतर – 03
एकूण – 243

संबंधित बातम्या : 

बिहारमध्ये पुन्हा नितीशराज!; नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

कार्यकर्तापद कुणीही हिसकवू शकत नाही, बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI