AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन MPV Suzuki Solio Bandit लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सुझुकीने (Suzuki) त्यांची मल्टी पर्पज व्हेईकल Suzuki Solio Bandit लाँच केली आहे.

नवीन MPV Suzuki Solio Bandit लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
| Updated on: Nov 28, 2020 | 3:38 PM
Share

टोकियो : जपानची कार निर्मिती करणारी कंपनी सुझुकीने (Suzuki) त्यांची मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) Suzuki Solio Bandit लाँच केली आहे. या एमपीव्हीचं डिझाईन एखाद्या बॉक्सप्रमाणे बनवण्यात आलं आहे, ज्यामुळे ही कार वेगळी दिसते. कंपनीने जपानमध्ये ही कार 2,006,400 yen म्हणजेच 14.2 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 2,131,800 yen म्हणजेच 15.09 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. (Suzuki Solio Bandit MPV launched with a hybrid powertrain)

कंपनीने Suzuki Solio Bandit मोनोटोन आणि डुअल टोन कलर ऑप्शनसह लाँच केली आहे. या कारच्या फ्रंट पॅसेंजर सीट आणि रियर पॅसेंजर सीटमधील कम्फर्टची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या कारमध्ये फुल ऑटोमॅटिक एसी देण्यात आला आहे. तसेच 9 इंचांचा डिस्प्ले असलेली इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

या कारमध्ये कीलेस एंट्री, पॉवर स्टियरिंग, स्लायडिंग डुअर, ड्रायव्हर-पॅसेंजर सीट हीटरसह 6 स्पीकर्सही लावण्यात आले आहेत. तसेच पुढच्या बाजूला असणाऱ्या दोन्ही सीट्स अॅडजस्टेबल आहेत. या कारमध्ये मोठ्या क्रोम बॉर्डरसह फ्रंट ग्रिल आणि स्लिक एलईडी हेडलँम्प्स आणि डीआरएल पाहायला खूप आकर्षक दिसतं. तसेच यासोबतच राऊंड फॉग लॅम्प्स अलॉय व्हील्स या एमपीव्हीची शोभा वाढवतात.

Suzuki Solio Bandit मध्ये 1.2 लीटरचे गॅसोलीन इंजिन दिले आहे. जे 6,000 rpm वर 91 पीएसचे मॅक्झिमम पॉवर आणि 6,000 rpm वर 118 एनएम टॉर्क जनरेट करतं. सुझुकीने या कारमध्ये 3 रायटिंग मोड दिले आहेत. जे Urban, Suburban आणि Highway आहेत. या कारच्या दोन्ही व्हेरिएंटचं मायलेज 15.3 किलोमीटर प्रति तास ते 21.1 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.

या कारमध्ये डुअल एअरबॅग्ससह एसआरएस एअरबॅग्स दिल्या आहेत. तसेच लेन डेव्हिएशन वॉर्निंग सिस्टिम, अॅडेप्टिव्ह क्रूज कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर्स, हेड अप डिस्प्ले, ESP, EBD सोबत ABS, फ्रंट डिस्क ब्रेक, हिल होल्ड कंट्रोल, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, सिक्युरिटी अलार्म सिस्टिम, इंजिन मोबिलायझर आणि इमरजन्सी पंक्चर रिपेयर किटसह अनेक फीचर्स दिले आहेत.

संबंधित बातम्या

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

Kia Motors च्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; कंपनीने सर्व गाड्या परत मागवल्या

ठरलं! Nissan Magnite ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

(Suzuki Solio Bandit MPV launched with a hybrid powertrain)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.