Swabhimani Milk Agitation LIVE | राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, राजू शेट्टींचा इशारा

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त आंदोलनकर्त्यांनी सांगलीत थेट गोकुळ दूध संघाचा दूध टँकर फोडला (Dairy Farmers Protest for Milk price).

Swabhimani Milk Agitation LIVE | राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, राजू शेट्टींचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 4:26 PM

मुंबई : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरु केलं आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्यभरात दुधाचे टँकर अडवून दूध ओतून दिले (Dairy Farmers Protest for Milk price). अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध केंद्रावर न देता गरीबांना मोफत दिले. आक्रमक आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील दूध वाहतूक देखील रोखली. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.

राजू शेट्टी यांच्या दुधाबाबतच्या प्रमुख मागण्या

  1. निर्यातीला अनुदान द्या
  2. आयात पूर्णपणे बंद करा
  3. GST रद्द करा
  4. शेतकऱ्याला थेट अनुदान द्या

आंदोलनाच्या चारपैकी तीन मागण्यांचा फायदा दूध संघांना आहे. जर दूधसंघांना फायदा झाला तर शेतकऱ्यांना होईल. मात्र आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.

LIVE Updates:

बैठकीनंतर मंत्री सुनील केदार काय म्हणाले?

  •  शेतकरी हाच आमचा केंद्र, चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक होतेय असं नाही, ही बैठक आधीच नियोजित होती, कोरोना संकटामुळे परिस्थिती बिकट
  • मागच्या सरकारने 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला, मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही, हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे
  • राजू शेट्टींबाबत मी काही बोलणार नाही, राज्याच्या धोरणाचा निर्णय मंत्रिमंडळ स्तरावर होतो, मंत्री स्तरावर होत नाही
  • दूध भुकटीचा निर्णय आम्ही घेतला, ही मागणी कोणत्याही पक्षाने केली नव्हती, आम्ही स्वत:हून हा चांगला निर्णय घेतला
  • दूध भुकटीबाबत मी केंद्राशी संपर्क केला, गडकरी, फडणवीस यांनाही पत्र दिलं

बैठकीनंतर राजू शेट्टी काय म्हणाले?

  •  दुध भुकटी आणि बटरचा प्रश्न आहे ज्यामुळे भाव पडले आहेत. त्याबाबत केंद्र सरकारशी बोलून निर्याती संदर्भात पाठपुरावा करावा, अशी चर्चा बैठकीत झाली. WTO चा एकही सदस्य नियम पाळत नाही. सबसिडी देऊन देशातील शिल्लक दुध भुकटी निर्यात करण्यात यावी, अशी चर्चा झाली. मंत्री सुनील केदार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही आणि दूध उत्पादकांना दिलासा मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील.
  • केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणाने पुढे आल्याशिवाय तोडगा निघणार नाही. पण राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही.

बैठकीनंतर सदाभाऊ खोत काय म्हणाले?

  •  दूध उत्पादक शेतकरी किंवा शेतमजूर सगळे अडचणीत आले आहेत. या संकट काळात त्यांच्याजवळ नगदी पैसे मिळणारा एकमेव दुधाचा व्यवसाय आहे. राज्य सरकारने बैठक बोलावली. दुधाच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीत गाईच्या दुधाला सहा रुपये अनुदान देण्यात यावं, खासगी किंवा सरकारी दुध संघ असतील त्यांना दूध निर्यात केल्यानंतरच प्रतिलीटर 20 रुपये अनुदान देण्यात यावं, अशी मागणी मंत्र्याकडे केली. मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
  • जो पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही, दुध भुकटीच्या निर्यातीला अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलनाची दिशा दोन दिवसात ठरवू

[svt-event title=”राज्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन चिघळेल, राजू शेट्टींचा इशारा” date=”21/07/2020,4:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

  •  दूध दरवाढबाबत सुरु असलेली बैठक संपली.

[svt-event title=”दूध दरवाढीबाबत मंत्रालयात बैठक सुरु” date=”21/07/2020,3:05PM” class=”svt-cd-green” ] 

[/svt-event]

[svt-event title=”हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करु : कृषीमंत्री दादा भुसे” date=”21/07/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव, मग दूध ओतल्यावर नासाडी का म्हणायचं? : राजू शेट्टी” date=”21/07/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जालन्यात प्रतिलिटर 5 रुपये अनुदानासह विविध मागण्यांसाठी आंदोलन” date=”21/07/2020,9:25AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात पुढील 3 महिन्यासाठी राज्य सरकारने प्रतिलिटर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवस दूध संकलन न करण्याचं आवाहन, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद, शेतकऱ्यांकडून दूध संकलन न करता फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन, अंबड तालुक्यातील वडीगोद्रीत गोरगरीबांना 50 लिटर दूधाचे मोफत वाटप [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आक्रमक” date=”21/07/2020,09:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अहमदनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दूध आंदोलन सुरुच” date=”21/07/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दूध आंदोलन सुरुच, अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही आंदोलन, दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव देण्याची मागणी, किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, डॉ. अजित नवले यांच्याकडून कालपासून आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध : डॉ.अजित नवले” date=”21/07/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये अनेक ठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात” date=”21/07/2020,8:59AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये अनेक ठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिंडोरी चिंचखेडमध्ये महादेवांना दुग्धअभिषेक, सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी दुग्धअभिषेक, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात दूध आंदोलनाला पाठिंबा देत गोरगरिबांना मोफत दूध वाटप” date=”21/07/2020,8:54AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील नांदणी येथे सर्व दूधउत्पादकांकडून बंदला प्रतिसात देत दूध गरजूंना आणि गोरगरिबांना मोफत वाटप [/svt-event]

[svt-event title=”दूध दरासंदर्भात आज मंत्रालयात बैठक” date=”21/07/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ] दूध दरासंदर्भात आज मंत्रालयात बैठक, दुपारी 2 वाजता मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, दूध संघाच्या प्रतिनिधींना पाचारण, शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दुधाला भाव मिळावा म्हणून छावा संघटनेचं प्रतिकात्मक आंदोलन” date=”21/07/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात दुधाला भाव मिळावा म्हणून छावा संघटनेचं प्रतिकात्मक आंदोलन, शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिमा छावा संघटनेकडून दुधात, लॉकडाऊन असल्यानं छावाचे नेते धनंजय जाधव यांचं स्वतःच्या घरातच प्रतिकात्मक आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनाला सुरुवात” date=”21/07/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनाला सुरुवात, बिद्री परिसरात गोकुळ दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतले, स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक, तर शिरोळ तालुक्यातील नांदनी येथे काळभैरवनाथला दुग्ध अभिषेक घालत आंदोलनाला सुरुवात [/svt-event]

सांगली जिल्ह्यातील एलूर फाट्याजवळ पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी आंदोलन केलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा भडका उठला. दूध उत्पादक शेतकऱ्याला दुधाचा योग्य भाव द्या, गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव द्या या मागणी साठी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बुलडाणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाण्यातही दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन केलं. सरकारचा आणि सद्यस्थितीतील दूध दराचा निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांनी चक्क दुधाने बैलाला अंघोळ घातली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुधाला 10 रुपये अनुदान आणि दूध पावडरला 50 रुपये अनुदान देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या निरोड गावातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

जालना

जालना जिल्ह्यातही दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भर पावसात आंदोलन केलं. स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बगाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जालन्यातील वाघरुळ शिवारात कार्यकर्त्यांनी दूध टँकर रोखला. पाऊस सुरु असतानाही आंदोलनकर्त्यांनी दुधाचे 2 टँकर रोखून निषेध केला.

संबंधित बातम्या :

Lockdown : राज्यातील दूध विक्रीला लाखो लिटरचा फटका

दूध दरवाढीमुळे व्यावसायिकांची चांदी, शेतकऱ्यांचे हात मात्र कोरडेच!

LIVE: दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक, शेतकरी संघटनांसोबत चर्चा होणार

भाजपचं 1 ऑगस्टचं आंदोलन आजच कसं? त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा : पशु व दुग्ध विकास मंत्री

संबंधित व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.