‘टाटा मोटर्स’कडून चार कार लाँच होणार, पाहा किंमत

| Updated on: Jan 22, 2020 | 12:03 PM

भारतातील प्रसिद्ध कार निर्मिती कंपनी टाटा मोटर्स भारतात आज (22 जानेवारी) चार कार लाँच (Tata launch new four car) करणार आहे.

टाटा मोटर्सकडून चार कार लाँच होणार, पाहा किंमत
टाटा मोटर्सने नोंदवला नवा विक्रम
Follow us on

मुंबई : भारतातील प्रसिद्ध कार निर्मिती कंपनी टाटा मोटर्स भारतात आज (22 जानेवारी) चार कार लाँच (Tata launch new four car) करणार आहे. कंपनी आज टाटा नेक्सॉन, टाटा टियागो आणि टाटा टिगोरचे फेसलिफ्ट वर्जन लाँच करणार आहे. त्यासोबत एक नवी प्रीमिअम हॅचबॅक टाटा अल्ट्रॉजही लाँच (Tata launch new four car) करणार आहे. टाटा अल्ट्रॉजला गेल्यावर्षी 3 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. नुकतेच या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. या सर्व गाड्यांची बुकिंग सुरु झाली आहे.

5050 लाखापासून टाटा अल्ट्रॉजची सुरुवात

टाटा अल्ट्रॉजला दोन इंजिन ऑप्शन आहेत. 86 bhp पॉवरचे 1.2 लीटर पेट्रोल आणि 90 bhp पावरचे 1.5 लीटर डिझेल इंजिनमध्ये दिलं आहे. दोन्ही इंजिन बीएस 6 कम्प्लायंट आहेत. कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह असेल. टाटा अल्ट्रॉजची स्पर्धा मारुती सुझुकी Baleno आणि ह्युंदाई Elite i20 सोबत होणार आहे. या कारची किंमत 5.50 लाख रुपये ते 8.50 पर्यंत असू शकते.

अल्ट्रॉजनंतर सर्वांची नजर Tata Nexon कारवर आहे. या कारची डिझाईन टाटा नेक्सन EV प्रमाणे थोडीफार असणार आहे. ही सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डीझेल इंजिनसह आहे. कारच्या डिझाईनमध्ये बदल केले असून त्यात काही नवे फीचर जोडले गेले आहेत. या नव्या टाटा नेक्सॉनची किंमत 7 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

2020 Tata Tigor आणि Tata Tiago गाड्या बीएस 6 वाल्या इंजिन 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डीझेलसोबत येणार आहे. या गाड्यांमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि AMT चा पर्याय मिळू शकतो. याशिवाय कंपनी सीएनजीही सुरु करु शकते. टाटा टियागोची किंमत 5 लाख ते 7 लाख आणि टाटा टिगोरची किंमत 6 लाख ते 8 लाख रुपयांमध्ये असू शकते.