
एसटी महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून तोट्या चालले होते. त्यामुळे एसटी महामंडळाला सरकारी मदतीशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन काढणे देखील अवघड बनले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात इतक्या वर्षांच्या अंतराने महामंडळ प्रथमच फायद्यात आले आहे. हा चमत्कार कसा घडला. यासाठी एसटी महामंडळाचे प्रवासी वाढण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या काही योजना पथ्यावर पडल्या आहेत. परंतू एसटी महामंडळाला खाजगी वाहतूकीच्या स्पर्धेचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यातच एसटी महामंडळाला डिझेलवर सर्वाधिक कर भरावा लागत आहे. तसेच प्रवासी कराच्या रुपातही एसटी महामंडळाला सर्वाधिक रक्कम शासनाकडे भरावी लागत आहे. त्यातच एसटीच्या ताफ्यात सध्या केवळ 15,400 गाड्या शिल्लक असून जुन्या गाड्या वारंवार बंद पडत असल्याने आणि नव्या गाड्या खरेदी रखडल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सकडे नाईलाजाने वळत आहेत. गेली अनेक वर्षे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 31 विभागांपैकी 20 विभागांनी ऑगस्ट महिन्यात नफा कमविला...