आखाती देशात अडकलेले विद्यार्थी मायदेशात, मनसेच्या मागणीची ठाकरे सरकारकडून तात्काळ दखल

| Updated on: Jun 29, 2020 | 3:36 PM

आखाती देशामध्ये अडकून पडलेले अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात (students stuck in Gulf countries return to Maharashtra) झाली आहे.

आखाती देशात अडकलेले विद्यार्थी मायदेशात, मनसेच्या मागणीची ठाकरे सरकारकडून तात्काळ दखल
Follow us on

मुंबई : आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेले (students stuck in Gulf countries return to Maharashtra) अनेक विद्यार्थी तसेच कामासाठी गेलेले नागरिक राज्यात परतण्यास सुरुवात झाली आहे. मनसेने याबाबतची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सरकारने युद्धपातळीवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न केले. परदेशातून मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांद्वारे आभार मानले.

महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि कामानिमित्त गेलेले अनेक लोक आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालावे. मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगांवकर, आमदार राजू पाटील, सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने यांनी याबाबतची मागणी केली होती.

तसेच इतर राज्यांना परदेशातून येण्यासाठी जर चार्टर विमानं मिळू शकतात. तर महाराष्ट्राला का नाही”, असा सवाल मनसेने उपस्थितीत केला आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीयन लोकांनाच प्राधान्याने राज्यात परत आणायला हवं” असं मत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे व्यक्त केलं होतं.

मनसेच्या या मागणीची दखल घेऊन सरकारने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना युध्दपातळीवर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर आज अनेक विद्यार्थी परदेशातून मायदेशी परतले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह पक्षाचेही आभार मानले. (Mns Demand get complete many students stuck in Gulf countries return to state)

संबंधित बातम्या : 

Speak Up India | “वा रे मोदी तेरा खेल…” इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरात आंदोलन

Rajesh Tope | कुठलाही संभ्रम नाही, पोलिस कारवाई म्हणजे लॉकडाऊन नाही, भाजपच्या टीकेला टोपेंचे उत्तर