AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajesh Tope | कुठलाही संभ्रम नाही, पोलिस कारवाई म्हणजे लॉकडाऊन नाही, भाजपच्या टीकेला टोपेंचे उत्तर

दुचाकी आणि चारचाकी चालकांनी अनलॉक सुरु असताना विनाकारण बाहेर पडू नये, नियम पाळावे, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं. (Rajesh Tope clarifies no Lockdown after BJP MLA Nitesh Rane criticizes)

Rajesh Tope | कुठलाही संभ्रम नाही, पोलिस कारवाई म्हणजे लॉकडाऊन नाही, भाजपच्या टीकेला टोपेंचे उत्तर
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 29, 2020 | 12:12 PM
Share

मुंबई : कुठलाही संभ्रम नाही, राज्यात लॉकडाऊन नाही, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याबाबत केलेल्या टीकेला टोपेंनी उत्तर दिले. (Rajesh Tope clarifies no Lockdown after BJP MLA Nitesh Rane criticizes)

मुंबई पोलिसांची कारवाई ही नियमानुसार आहे. नियमबाह्य पद्धतीने घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार. पोलिसांची कारवाई म्हणजे लॉकडाऊन वाढवले असं होत नाही. दुचाकीवर डबल सीट, किंवा एका गाडीत चार जण दिसले, तर कारवाई होणारच, असं राजेश टोपे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

जवळपास सात हजार वाहने जप्त केली. दुचाकी आणि चारचाकी चालकांनी अनलॉक सुरु असताना विनाकारण बाहेर पडू नये, नियम पाळावे, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.

हेही वाचा : Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?

ज्या ठिकाणी रुग्ण वाढतील, तिथे लॉकडाऊन करण्याचा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना अधिकार आहे. केंद्रीय पथकाने ठाण्यातील कोविड परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. तिथे कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा उद्या किंवा परवा दौरा करुन आपण काय त्रुटी आहेत, हे जाणून घेणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं.

नितेश राणे काय म्हणाले ?

“हे सरकार इतके गोंधळलेले आहे, की पोलिस कर्मचारी आणि सरकारने लॉकडाऊन अधिक कडक केल्याने लोकांना काय करावे हे कळत नाही. काल 7000 वाहने सरकारच्या स्पष्ट संदेशाशिवाय जप्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना का दिल्या नाहीत, की आपण लॉकडाऊन करत आहोत?” असे ट्वीट भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

(Rajesh Tope clarifies no Lockdown after BJP MLA Nitesh Rane criticizes)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...