मुंबई, पुण्यानंतर ठाण्यात कोरोनाचा कहर, कुठे किती कोरोनाबाधित?

| Updated on: May 27, 2020 | 11:44 PM

ठाणे महानगर पालिका क्षेत्रात आतापर्यंत 2 हजार 294 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. (Thane Corona Cases Patient Update)

मुंबई, पुण्यानंतर ठाण्यात कोरोनाचा कहर, कुठे किती कोरोनाबाधित?
Follow us on

ठाणे : मुंबई, पुण्यानंतर ठाण्यातही कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत (Thane Corona Cases Patient Update) आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात आतापर्यंत 2 हजार 294 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 890 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 1 हजार 347 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे (Thane Corona Cases Patient Update) उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 41 टक्के रुग्ण बरे झाले आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर- सावरकर नगर प्रभाग समिती सर्वाधिक 649 रुग्ण आहेत.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पालिका स्थरावर कोरोना वॉरियर्स अशा 600 लोकांची टीम शहरात काम करत आहे. ठाणे शहरात अनेक उपाययोजना केल्या जात आहे. तसेच पालिका स्थरावर आणखी पाच ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करत आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रुग्णांसाठी अधिगृहित खासगी रूग्णालयाचे डॉक्टर्स-कर्मचारी कामावर रूजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

ठाणे महापालिका प्रभाग समितीमध्ये कुठे किती कोरोनाबाधित?

1. मुंब्रा प्रभाग समिती – 298

2. दिवा प्रभाग समिती – 89

3. माजीवडा प्रभाग समिती – 124

4. वर्तक प्रभाग समिती – 122

5. लोकमान्य नगर- सावरकर नगर प्रभाग समिती – 649

6. नौपाडा- कोपरी प्रभाग समिती – 264

7. उथळसर प्रभाग समिती – 186

(Thane Corona Cases Patient Update)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 105 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 56,948 वर

Pune Corona | पुण्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं, आतापर्यंत 2,875 जणांची कोरोनावर मात