थांबलेल्या रिक्षातून महिलेचा वेदनादायी आवाज, रस्त्यातच प्रसूती, औरंगाबादेत वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण

| Updated on: Nov 18, 2021 | 12:40 PM

शहरातील जालना रोडवरील एका रिक्षातून वाहतूक पोलिसांना महिलेचा आवाज आला. त्यांनी पाहिले तर रिक्षातच प्रसूती झाली होती. अंमलदार जाधव यांनी सहकाऱ्याच्या मदतीने तत्काळ दुसरा रिक्षा बोलावून महिलेला घाटी रुग्णालयात नेले. या सतर्कतेमुळे माता व बाळाचे प्राण वाचले.

थांबलेल्या रिक्षातून महिलेचा वेदनादायी आवाज, रस्त्यातच प्रसूती, औरंगाबादेत वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रसूतीच्या (Mother gave birth) वेदना होऊ लागलेल्या मातेला घेऊन जाणारी रिक्षा जालना रोडवर अचानक बंद पडली. रिक्षातच सदर महिलेला प्रसूती कळा आल्या आणि त्यातच तिची प्रसूती झाली. मात्र वाहतूक पोलिसांनी (Aurangabad traffic police) समय सूचकता दाखवत माता आणि बाळाला तत्काळ घाटी रुग्णालयात नेले आणि या दोघांचेही प्राण वाचवण्यात मदत केली.

थांबलेल्या रिक्षातून महिलेचा आवाज…

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जालना रोडवरील वाहतूक तशी कमी होती. हायकोर्टाच्या पुढे उभ्या असलेल्या एका रिक्षातून महिलेच्या वेदनेचा आवाज ऐकू येत होता. बाजूलाच कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार संतोष चंद्रसेन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा एका महिलेने रस्त्यावरच  बाळाला जन्म दिल्याचे दिसले. जाधव यांनी आपले सहकारी पोलीस नाईक रावसाहेब पचलोरे यांच्या मदतीने तत्काळ दुसरा रिक्षा थांबवला. त्यातून महिलेला घाटीत पोहोचवले. तिथे त्वरीत उपचार मिळाल्याने बाळ आणि आई सुखरूप आहेत.

देवाच्या रुपाने धावून आले पोलीस

सदर महिलेचे नाव अनुराधा गणेश बरथरे असून त्या मुकुंदवाडीत राहतात. सोमवारी महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न कुटुंबियांचा सुरु होता. मात्र  रुग्णवाहिका  न मिळाल्याने त्यांनी रिक्षा बोलावली. पण ती वाटेतच बंद पडल्यानंतर वाहतूक पोलीस देवाच्या रुपाने आले आणि महिलेला घाटीत नेले. त्यांच्यामुळेच महिला व तिचे बाळ सुखरूप असल्याची प्रतिक्रिया बरथरे कुटुंबियांनी दिली. घाटीत सध्या महिलेवर उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर

Nashik| लहानग्याला वाचवण्यासाठी थोरल्याची उडी, सख्खे भाऊ तळ्यात बुडाले, क्षणात होत्याचं नव्हतं!