AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला, विद्यार्थी बचावले

सोलापूर : नगरपालिका शाळेतील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी सोलापूरमधील मंगळवेढा येथे घडली. दोन मजली शाळेच्या इमारतीचा वरचा भाग कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. शाळेच्या निष्काळजीपणावर सध्या पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी मंगळवेढा […]

सोलापुरात शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला, विद्यार्थी बचावले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

सोलापूर : नगरपालिका शाळेतील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी सोलापूरमधील मंगळवेढा येथे घडली. दोन मजली शाळेच्या इमारतीचा वरचा भाग कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. शाळेच्या निष्काळजीपणावर सध्या पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी मंगळवेढा येथील नगरपालिका शाळेत ही घटना घडली. विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर उभे असताना ही इमारत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या विरोधात पालकांमधूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकतेच जानेवारी महिन्यातही शाळेची भिंत कोसळल्याने अमरावती येथील एका विद्यार्थाचा मृत्यू झाला होता. यासोबतच पुण्यातील जिल्हापरिषदेच्या अनेक शाळांही धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी शाळेच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावर राज्याच्या शिक्षण विभागाकडूनही काना डोळा करण्यात येतो का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल