दिल्लीतील आरोग्यमंत्र्यांच्या घरात चोरी, बाथरुमच्या नळासह शोभेच्या वस्तू चोरीला

| Updated on: Sep 23, 2019 | 9:21 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघड (Theft At Satyender Jain Home) झाली आहे.

दिल्लीतील आरोग्यमंत्र्यांच्या घरात चोरी, बाथरुमच्या नळासह शोभेच्या वस्तू चोरीला
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघड (Theft At Satyender Jain Home) झाली आहे. दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या जैन यांच्या घरात चोरीची (Theft At Satyender Jain Home) घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी जैन यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

जैन यांचे दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात चार मजली घर आहे. ते गेल्या काही दिवसांपासून सरकारी घरात राहत असल्याने सरस्वती विहार मधील घर 6 महिन्यांपासून बंद आहे.

रविवारी (22 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास त्यांच्या (Delhi Health Minister Satyender Jain) घराचा गेट उघडा असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब जैन परिवाराला याची माहिती दिली. जैन परिवार रात्री घरी पोहोचल्यानंतर आजूबाजूचे सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. घरात चोरी झाल्याचा अंदाज लावत घटनेची माहिती पोलिसांना दिली.

आरोग्यमंत्री असलेल्या जैन यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. यात त्यांनी घरातील काही फोटो ट्विट केले असून, दिल्लीतील चोरांना पोलिसांची भिती राहिलेली नाही असे (Delhi Health Minister Satyender Jain) लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांच्या घरातून स्वयंपाक घर आणि बाथरुमचे नळ चोरी करण्यात आले आहेत. तसेच जैन यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात काही शोभेच्या वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांचीही चोरी झाली आहे.


दरम्यान सत्येंद्र जैन यांच्या पत्नीने याबाबतची तक्रार केली असून दिल्ली पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे.