तळीरामांना धीर निघेना, सांगलीत वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास

| Updated on: Apr 23, 2020 | 5:31 PM

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे अशाच काही तळीरामांनी संगम वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास केले आहेत (Theft in Wine shop in Sangli amid lockdown).

तळीरामांना धीर निघेना, सांगलीत वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास
Follow us on

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. व्यसनाधीन झालेल्या या तरुणांकडून वारंवार दारुची दुकानं काहीवेळ का होईना सुरु करण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र, सरकारने अद्याप त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे तळीरामांचा धीर सुटताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे अशाच काही तळीरामांनी संगम वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास केले आहेत (Theft in Wine shop in Sangli amid lockdown). त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

संबंधित घटनेनंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे चोरीची घटना घडली तेव्हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे पोलिसांना चोरीबाबत काही वेगळ्या शंका देखील आहेत. त्या बाजूचाही विचार तपासात सुरु आहे. संबंधित वाईन शॉप सांगली जिल्ह्यातील मिरज एस टी स्टँड परिसरात आहे. येथूनच चोरट्यांनी संगम वाईन शॉप फोडून दारु आणि बियरचे बॉक्स लंपास केले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र दारु विक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांना दारु मिळणं कठिण झालं आहे. त्यामुळे तळीरामांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे दारुची दुकाने फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र दुकानातील सीसीटीव्ही बंद असल्याने चोरीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत किती रकमेची दारू चोरीला गेली याचा तपास शहर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. मात्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे वाईन शॉप फोडल्याने शहरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का, पुढील दीड वर्ष महाभाई भत्त्यात वाढ नाही

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘सीड मदर’ राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

मुंब्र्यात तब्लिगींवर मोठी कारवाई, 25 जण अटकेत, मलेशिया, बांगलादेशींचा समावेश

ड्युटीवरील पोलिसाला कोरोना झाल्यास 10 हजार रुपयांची मदत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार

Theft in Wine shop in Sangli amid lockdown