AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्र्यात तब्लिगींचा क्वारंटाईन कालावधी संपला, कोर्टाकडून जामीन मंजूर

मरकजप्रकरणी पोलिसांनी मुंब्रा येथून 25 तब्लिगींना (Thane police arrest 25 Tablighi ) ताब्यात घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं.

मुंब्र्यात तब्लिगींचा क्वारंटाईन कालावधी संपला, कोर्टाकडून जामीन मंजूर
| Updated on: Apr 23, 2020 | 5:48 PM
Share

ठाणे : मरकजप्रकरणी पोलिसांनी मुंब्रा येथून 25 तब्लिगींना (Thane police arrest 25 Tablighi ) ताब्यात घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या सर्वांचा आज क्वारंटाईनचा कालावधी संपला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत अटक केली. त्यांना आज कोर्टात सादर केलं असता त्यांचा जामीन मंजूर झाला. ठाणे गुन्हे शाखा 1 कडून ही कारवाई करण्यात आली (Thane police arrest 25 Tablighi ).

मुंब्रा डायघर येथील अटक करण्यात आलेल्या 25 तब्लिगींना गुन्हे शाखेने आज कोर्टात हजर केले असता कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मरकज येथून आल्यानंतर हे 25 जण मदरसा आणि शाळेत राहिले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यांचे रिपोट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये काही  बांग्लादेश आणि मलेशियाचे नागरिक आहेत.

मुंब्र्यातील अल नदिउल फला या शाळेच्या चार विश्वास्थावर 8 परकीय नागरिक आणि 2 भारतीय यांची कोणतीही परवानगी न घेता ठेवल्याचा आरोपाखाली तसेच तन्वीय उल उलूल मदर्सच्या विश्वास्थनावरदेखील 13 परकीय नागरीक ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या मुब्रा भागातील एका मशिदीमधून 14 बांग्लादेशी आणि 2 आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीतून 8 मलेशियाच्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं होतं. यातील काही जण 10 मार्चला निजामुद्दीन या ठिकावरुन आले होते.

क्वारंटाईनदरम्यान त्यांची दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोन्ही वेळा टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. या सर्वांचा आज क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हे सर्व लोक मशिदीमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचा संपर्क लोकांशी आला नाही. त्याचबरोबर सुदैवाने मरकज कार्यक्रमाशी त्यांचा काही संबंध नाही. कारण ते 10 मार्चच्या आधी परतले होते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.