गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

केंद्र सरकारने देशातली सर्व गरीब आणि होतकरु मजुरांच्या (Sonia Gandhi on Labours) बँक खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये जमा करावे", अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

नवी दिल्ली : “केंद्र सरकारने देशातली सर्व गरीब आणि होतकरु मजुरांच्या (Sonia Gandhi on Labours) बँक खात्यात तातडीने 7 हजार 500 रुपये जमा करावे”, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. “मजुरांना अन्नाचा पुरवठा व्हावा यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत”, असंदेखील सोनिया गांधी म्हणाल्या. कॉंग्रेस कार्यकारी समितीची आज (23 एप्रिल) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली (Sonia Gandhi on Labours).

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की, टेस्टिंगवर काहीच पर्याय नाही. मात्र, तरीही देशात कोरोना टेस्टिंग फार कमी प्रमाणात होत आहेत. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणारे पीपीई किट्सदेखील चांगल्या गुणवत्तेचे नाहीत. आम्ही सरकारला अनेक सल्ले देत आहोत. मात्र, सरकार त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करताना दिसत नाही”, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

“लॉकडाऊनमुळे देशातील शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. शेतकरी हतबल झाला आहे. त्यांच्या समस्यांचं लवकरात लवकर निराकरण करायला हवं. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना मदत करायला हवी”, अशीदेखील मागणी सोनिया गांधी यांनी यावेळी केली.

“कोरोनाविरोधाच्या या लढाईत 24 तास मेहनत करणारे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्याप्रती कृतज्ञता भावना ठेवली पाहिजे. त्यांच्या कार्याला सलाम केलं पाहिजे. हे सर्वजण स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत”, असंदेखील सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

“घाई नको, भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा”

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

मराठवाड्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 62 वर, एकट्या औरंगाबाद शहरात 40 रुग्ण

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *