साताऱ्यात बोअरवेल ट्रक पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 जखमी

बोअरवेल ट्रक पलटी होऊन साताऱ्यात भीषण अपघात झाला आहे (Borewell truck accident in Satara).

साताऱ्यात बोअरवेल ट्रक पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 जखमी

सातारा : बोअरवेल ट्रक पलटी होऊन साताऱ्यात भीषण अपघात झाला (Borewell truck accident in Satara). हा अपघात आज सकाळी 6.15 च्या सुमारास खंबाटकी बोगद्याजवळील एस वळणावर झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, खंडाळा पोलीस आणि महामार्ग पोलीस यांच्या मदतीने जखमींना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बोअरवेल ट्रक वाई येथून खंडाळा येथे जात होता. या ट्रकमध्ये 13 कामगार होते. ट्रक भरधाव वेगात धावत होता. दरम्यान, हा ट्रक खंबाटकी बोगद्याजवळील एस वळणार आला असता चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याशेजारील कठड्याला धडकला. यात ट्रक पलटी झाला (Borewell truck accident in Satara).

या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गाडीत लोखंडी पाईप असल्यामुळे कामगार जखमी झाले, असं पोलीस तपासात उघड झालं आहे. जखमींपैकी बहुतांश कामगार हे तमिळनाडूचे असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, अजित पवार बजेट मांडणार

Published On - 10:18 am, Fri, 6 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI