अकोल्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळपर्यंत 18 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत (Corona Patient Akola) आहेत.

अकोल्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळपर्यंत 18 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

अकोला : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत (Corona Patient Akola) आहेत. अकोला जिल्ह्यातही आज (13 मे) सकाळी 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये नऊ महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अकोल्यात आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये सातजण हे खैर मोहम्मद प्लॉटमधील रहिवासी आहेत. तर तीनजण गवळीपुरा, तीनजण रामनगर आणि प्रत्येकी एकजण बापू नगर, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आलसी प्लॉट येथील रहिवाशी आहेत.

दरम्यान न्यू भीमनगर येथील एका 62 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू काल (12 मे) रात्री झाला आहे. ही महिला 4 मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती.

अकोला जिल्ह्यात काल एकूण 41 रुग्णांना सोडण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे रुग्ण सिंधी कॅम्प, कृषी नगर, अकोट फैल आणि बैदपूर येथील रहिवाशी आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 186 वर पोहोचली आहे. तर यामध्ये एकूण 15 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. अकोल्यात आतापर्यंत 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 24 हजार 427 वर, दिवसभरात 53 जणांचा मृत्यू

मुंबईत पुन्हा पोलिसाचा ‘कोरोना’मुळे बळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Published On - 12:15 pm, Wed, 13 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI