Drugs Connection | भारती-हर्षच्या अटकेनंतर मालिका विश्वात खळबळ, पाहा कलाकार काय म्हणतायत…

| Updated on: Nov 23, 2020 | 1:55 PM

बॉलिवूडनंतर आता मालिका विश्वातही ड्रग्जचे कनेक्शन समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Drugs Connection | भारती-हर्षच्या अटकेनंतर मालिका विश्वात खळबळ, पाहा कलाकार काय म्हणतायत...
Follow us on

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन (Drugs Connection) प्रकरणातील एका मोठ्या कारवाईत एनसीबीने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना अटक केली आहे. बॉलिवूडनंतर आता मालिका विश्वातही ड्रग्जचे कनेक्शन समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. भारती आणि हर्षच्या अटकेनंतर त्यांच्या सहकलाकारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी बरेच कलाकार (TV Celebrities) माध्यमांपासून दूर पळताना दिसले (TV Celebrities reaction on Harsh and Bharti’s Arrest and drugs connection).

एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली.

करण पटेल

भारतीच्या अटकेनंतर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. करण पटेलने भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्यासमवेत कलर्सचा रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’मध्ये काम केले आहे. जेव्हा करणला याबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, ‘भारती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते हे मला माहिती नाही. आम्ही फक्त एका कार्यक्रमात काम केले आहे.’

करण म्हणतो, ‘आम्ही फक्त एका रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. मला याव्यतिरिक्त काहीच माहित नाही. या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. ती तिच्या आयुष्यात काय करते याबद्दल मला कल्पना नाही. मला याबद्दल अधिक काही बोलण्याची इच्छा नाही. या एका घटनेमुळे आपण संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला लक्ष्य करून नये असे मला वाटते.’ (TV Celebrities reaction on Harsh and Bharti’s Arrest and drugs connection)

इक्बाल खान

अभिनेता इक्बाल खान म्हणतो की, ‘भारतीसोबत मी काही वर्षांपूर्वी एका अ‍ॅक्शन रिअॅलिटी शोच्या अंतिम भागात काम केले होते. मला वाटते की ती एक अतिशय हुशार कॉमेडियन आहे. या विषयाबद्दल फारसे माहिती नाही, म्हणून मला यावर भाष्य करायला आवडणार नाही.’

‘आधी बॉलिवूड आणि आता मालिका विश्व यान टार्गेट केले जात आहे, असे मला अजिबात वाटत नाही. हे केवळ ड्रग्जची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी केली जाणारी कारवाई आहे. याचा आपल्या कामाशी किंवा क्षेत्राशी काही संबंध नाही. परंतु, या एका घटनेमुळे सगळ्या कलाकारांना त्याच नजरेने पहिले जात आहे आणि मी त्याच गोष्टीच्या विरुद्ध आहे.’

सुरेश मेनन

सुरेश मेनन म्हणतात, ‘आपल्या देशात ड्रग्जच्या सेवन करणे हा एक ट्रेंड झाला आहे. ड्रग्स घेणे किंवा मद्यपान करणे प्रत्येकाची वैयक्तिक पसंती आहे. परंतु, या गोष्टी आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नाहीत. त्या एखाद्या व्यक्तीला शारीरिकरित्या दुर्बल बनवतात. भारतीबद्दलची ही बातमी धक्कादायक होती. खूप दुःख झाले. तिने बरीच वर्षे कष्टा करून ही प्रतिष्ठा कमावली होती. या कारणामुळे प्रतिष्ठा गमावणे योग्य नाही.’ (TV Celebrities reaction on Harsh and Bharti’s Arrest and drugs connection)

सुबुही जोशी

टीव्ही अभिनेत्री सुबुही जोशी म्हणते की, ही बातमी तिच्यासाठी अतिशय धक्कादायक होती. तिने कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये भारतीसोबत काम केले आहे. भारती खूप हुशार असल्याचे तिने म्हटले. ‘बॉलिवूडनंतर आता एनसीबीचे लक्ष टीव्ही इंडस्ट्रीवर आहे. केवळ मनोरंजन विश्वच नाही तर आपला संपूर्ण समाज ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त होण्याची गरज आहे’, असे सुबुही म्हणाली.

(TV Celebrities reaction on Harsh and Bharti’s Arrest and drugs connection)