वंदेभारत स्लीपर ट्रेन संदर्भात मोठी अपडेट, संसदेत रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती, सुविधा आणि सुरक्षेवर खास फोकस
वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर ट्रेनच्या बाबतीत संसदेत रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली आहे.सरकारने तिच्या तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीशी संदर्भात माहिती दिली आहे.ज्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

भारतीय रेल्वे लवकरच लांबपल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासाचा अनुभव बदलण्याची तयारी करत आहे. वंदेभारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच दाखल होत आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ताजी माहिती दिल आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्ण यांनी लोकसभेत सांगितले की वंदेभारत स्लीपर ट्रेनचे डिझाईन संपूर्णपणे देशातच तयार केले आहे. याचे दोन ट्रेन सेट सध्या ट्रायल आणि कमिशनिंगच्या टप्प्यात आहेत. या अपडेट नंतर प्रवासी आणि खासदार यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन: काय अपडेट
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तरात सांगितले की वंदेभारत स्लीपर ट्रेनला खास करुन लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासाठी डिझाईन केले आहे. याचे दोन रेक तयार केले आहेत. आणि त्याची ट्रायल सुरु आहे. संसदेत अनेक सदस्यांना या ट्रेनला केव्हा आणि कोणत्या रुटवर सुरु करणार या संदर्भात उत्सुकता होती. या ट्रेनसाठी पायलट प्रोजेक्ट वा फिजिबिलीटी स्टडी तयार केला आहे का याची उत्सुकता संसद सदस्यांना आहे.
तंत्रज्ञान आणि सुरक्षेवर खास नजर
वंदेभारत स्लीवर ट्रेनला आधुनिक तंत्रज्ञान आणि हाय सेफ्टी फिचर्स असणार आहेत.ट्रेनला ‘कवच’ ही टक्कर विरोधी सुरक्षा प्रणाली लावण्यात आली आहे.याची डिझाईन स्पीड १८० किमी प्रति तास आहे. परंतू ऑपरेटींग स्पीड १६० किमी प्रति तास ठेवण्यात आली आहे. यात क्रॅश आणि झटके रहित सेमी-पर्मानंट कप्लर्स, एंटी क्लायंबर्स आणि उच्च पातळीवरील फायर सेफ्टी देण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे मंत्र्यानी लेखी उत्तरात दिली आहे.
प्रत्येक कोचमध्ये शेवटला फायर बॅरियर डोर लावलेले आहेत. इलेक्ट्रीकल कॅबिनेट आणि टॉयलेट्समध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम देण्यात आली आहेत. ट्रेनमध्ये रिजेनेरेटिव्ह ब्रेकींग सिस्टीम देखील आहेत. ज्यामुळे ऊर्जेची बचत होणार आहे. याशिवाय एअर कंडिशनिंग युनिट्समध्ये युव्ही-सी लॅम्प आधारित डिसइंन्फेक्शन सिस्टीम लावण्यात आला आहे.
यात्रेची सुविधा आणि दिव्यांगासाठी सुविधा
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.आपात्कालिन स्थितीत ट्रेन मॅनेजर वा लोको पायलटशी संवाद साधण्यासाठी इमर्जन्सी टॉक – बॅक युनिट्स देण्यात आले आहेत. दोन्ही टोकांनी ड्रायव्हींग कोचमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष शौचायल असती. तसेच सेंट्रलाईज्ड कोच मॉनिटरिंग सिस्टीमपासून एसी, लायटींग आणि अन्य सुविधा असतील.
