लेहला जम्मूचा भाग दाखवण्याची ट्विटरकडून चूक, केंद्र सरकारची थेट ट्विटरच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंटला नोटीस

| Updated on: Nov 12, 2020 | 10:13 PM

लडाखमधील लेहला जम्मू काश्मीरचा भूभाग दाखवणं ट्विटरला चांगलंच महागात पडलं आहे. केंद्र सरकारने ट्विटरच्या या चुकीची गंभीर दखल घेतली आहे.

लेहला जम्मूचा भाग दाखवण्याची ट्विटरकडून चूक, केंद्र सरकारची थेट ट्विटरच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंटला नोटीस
Follow us on

नवी दिल्ली : लडाखमधील लेहला जम्मू काश्मीरचा भूभाग दाखवणं ट्विटरला चांगलंच महागात पडलं आहे. केंद्र सरकारने ट्विटरच्या या चुकीची गंभीर दखल घेतली आहे. सरकारने या चुकीबद्दल थेट ट्विटरच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंटला नोटीस पाठवून लेहला जम्मू-काश्मीरमध्ये दाखवण्यामागचे कारण विचारले आहे. (Twitter misrepresents Leh as part of Jammu indian government issues notice to Twitter)

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने लडाख हा भाग केंद्रशासित प्रदेश  म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, ट्विटरने लडाखमधील लेह हा भूभाग जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर भारत सरकारने ट्विटरच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट यांना नोटीस लिहित चुकीबद्दल कारवाई का करु नये याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.

“भारत देशाच्या एकता आणि अखंडतेचा अपमान करण्याच्या उद्देशातून आपण केलेल्या चुकीवर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये?” असा सवाल भारत सरकारने ट्विटरला केला आहे.

संसदेच्या निर्णयाचा हेतुपुरस्सर अपमान

मंत्रालयाने ट्विटरला लिहिलेल्या आपल्या नेटिशित कडक पवित्रा घेतला आहे. नोटिशित  “लेहला जम्मू-काश्मीरचा भाग दाखवणे म्हणचे संसदेच्या निर्णयाचा अपमान आहे. संसदेच्या निर्णयानुसार लेह हा लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. पण ट्विटरने संसदेच्या निर्णयाचा अपमान करत लेहला जम्मू-काश्मीरचा भाग दाखवला. हा संसदेच्या निर्णयाचा अपमान आहे.” असे ताशेरे केंद्र सरकारने ट्विटरवर ओढले आहेत.

या आधीही ट्विटरकडून मोठी चूक

या आधीही ट्विटरने लेहच्या बाबतीत मोठी चूक केली होती.या आधी ट्विटरने लेहला चक्क चीनचा भूभाग असल्याचं सांगितलं होतं. भारत सरकारने ट्विटरच्या या चुकीचीही गंभीर दखल घेत ट्विटरला नोटीस पाठवली होती. त्यानंतर ट्विटरने आपली चूक मान्य करुन सुधारणा केली होती. मात्र, यावेळी लेहला जम्मू-काश्मीरमध्ये दाखल्याची चूक ट्विटरने अजूनही सुधारेली नाही. त्यामुळे भारत सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

ट्विटर नंतर फेसबुकचाही डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा ठपका

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट, सायबर विभागाच्या तपासात उघड

Raveena Tandon | रवीनाच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल!

(Twitter misrepresents Leh as part of Jammu indian government issues notice to Twitter)