अडीच वर्षाच्या चिमुकलीची उंच भरारी, प्रबळगड कलावंतीणीचा सुळका सर

अलिबागमधील अडीच वर्षाच्या चिमुरडीने प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताक दिनी सर (Small Girl trek prabhalgadh fort) केला.

  • Updated On - 8:45 am, Sun, 2 February 20 Edited By:
अडीच वर्षाच्या चिमुकलीची उंच भरारी, प्रबळगड कलावंतीणीचा सुळका सर

रायगड : अलिबागमधील अडीच वर्षाच्या चिमुरडीने प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताक दिनी सर (Small Girl trek prabhalgadh fort) केला. त्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. शर्विका म्हात्रे असं या चिमुरडीचं नाव असून ती अलिबागमधील लोणारे गावात राहते. विशेष म्हणजे शर्विकाने आपल्या आई-बाबांसह अर्ध्या तासात हा सुळका सर (Small Girl trek prabhalgadh fort) केला.

शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनीही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली. यापूर्वी शर्विका हिने अकरा किल्ले सर केले आहेत. आई वडिलांच्या संगतीने शर्विकाने हा सुळका सर केला.

कर्जत माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला असून तो चढण्यासाठी साधारण तीन तासाचा अवधी लागतो. तेथून कलावंतीण सुळका चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. कलावंतीण सुळका हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायर्‍या आणि आभाळाला भिडणारा सुळका तितकीच खाली खोल दरी अश्या नैसर्गिक रचनेमुळे हा सुळका सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. मात्र या चिमुकलीने हसत-खेळत हा गड सर केला आहे.

शार्विकाने या सुळक्यावर आरोहणकरून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावीत समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. शर्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे तिने सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरुड-जंजिरा,पद्मदुर्ग, उंदेरी कलावंतीण दुर्ग असे 11 किल्ले आणि गड सर केले आहेत. शर्विकाच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शार्विकाने गड सर करताना शिवरायांवर अधारीत ओव्या, पोवाडे, भुपाळ्या म्हणत कलावंतीणीचा सुळका गड सर केला. यामधून गड-किल्यांवर असलेले तिचे प्रेम आपणा सर्वांनाच पहावयास मिळाले. शर्विकाने आपल्या आई-वडीलांसमवेत 11 गड-किल्ले सर केले आहेत. शार्विकाला आपल्या आई-वडीलांकडूनच हा वारसा मिळाला आहे. शार्विकाचे आई- वडील हे पेशाने शिक्षक आहेत. तसेच ते दोघेही सह्याद्री प्रतिष्ठाणचे सदस्य हि आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI