AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दगडाने ठेचण्यापासून ते फाशी, बलात्काराच्या गुन्ह्याला कुठे कोणती शिक्षा ?

तेलंगणामध्ये महिला डॉक्टरसोबत बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई (Types of rapists punishment in other countries) करावी तसेच त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

दगडाने ठेचण्यापासून ते फाशी, बलात्काराच्या गुन्ह्याला कुठे कोणती शिक्षा ?
| Edited By: | Updated on: Dec 01, 2019 | 7:11 PM
Share

हैद्राबाद : तेलंगणामध्ये महिला डॉक्टरसोबत बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई (Types of rapists punishment in other countries) करावी तसेच त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आता केली जात आहे. हैद्राबादच्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

काही वर्षांपूर्वी दिल्लीत निर्भया प्रकरण झाल्यानंतरही बलात्कार करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई (Types of rapists punishment in other countries) करावी, अशी मागणी केली जात होती. त्यावेळी बलात्काराच्या शिक्षेत बदल करण्यात आले. भारतात 12 वर्षा पर्यंतच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला, तर त्या आरोपीला मृत्यूची शिक्षा देण्याचा कायदा करण्यात आला. याशिवाय जर 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलीवर बलात्कार झाला, तर आरोपीला 10 वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेव मिळू शकते.

देशात बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही बलात्कारासारखे प्रकार घडत असतात. आजही कुठे ना कुठे बलात्कार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कठोर कायदे असूनही गुन्हेगारांना मृत्यूच्या शिक्षेची भीती नाही. यामागे एखादे वेगळे कारण असू शकते. पण असे काही देश आहेत जिथे बलात्कार केल्यावर थेट मृत्यूची शिक्षा दिली जाते. आपल्या शेजारचा देश चीनमध्येही बलात्कार केल्यावर आरोपीला कठोर शिक्षा दिली जाते.

चीन : चीनमध्ये बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूची शिक्षा दिली जाते. तर काही घटनांमध्ये आरोपीचे गुप्तांग कापून टाकले जाते.

इराण : इराणमध्ये बलात्कार केल्यावर आरोपीला फाशी किंवा लोकांसमोर गोळी मारुन शिक्षा दिली जाते. यामध्ये जेव्हा पीडित आरोपीला माफ करते तेव्हा आरोपीला शिक्षेतून माफी मिळते. पण यानंतरही जन्मठेप दिली जाते.

अफगाणिस्तान : अपगाणिस्तानमध्ये अशा गुन्ह्यात खूप कठोर शिक्षा दिली जाते. या देशात पीडितेला न्याय देण्यासाठी चार दिवसात आरोपीच्या डोक्यात गोळी मारुन त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाते.

दक्षिण कोरिया : दक्षिण कोरियामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची माफी दिली जात नाही. येथे आरोपीला गोळी मारुन मृत्यूची शिक्षा दिली जाते.

सौदी अरब : सौदी अरबमध्ये सर्वता कठोर कारवाई केली जाते. येथे या गुन्ह्यासाठी आरोपीचे डोके धडापासून वेगळे केले जाते.

युएई : या देशात बलात्कारासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. सात दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाते.

इजिप्त : येथे आरोपीला सर्वांसमोर फाशी दिली जाते. जेणेकरुन इतर कुणी हे कृत्य करणार नाही यासाठी सर्वांसमोर शिक्षा दिली जाते.

इराक : ईराकमध्ये आरोपीला दगडाने मारुन मृत्यूची शिक्षा दिली जाते. येथे बलात्कार करणाऱ्या आरोपीला तो मरेपर्यंत दगडाने मारले जाते.

फ्रान्स : फ्रान्समध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला 15 वर्षांची शिक्षा दिली जाते. तसेत त्यामध्ये वाढ करुन ती 30 वर्षही केली जाऊ शकते.

नेदरलँड : या देशात बलात्कार केला, तर 15 वर्षाची शिक्षा दिली जाते. तसेच वैश्या महिलेसोबतही बलात्कार केला तरीही आरोपीला शिक्षा दिली जाते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.